bank closed

बँकांनी १५ मार्च म्हणजे सोमवारी आणि १६ मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवण्याचा(bank strike) निर्णय घेतला असल्याचे सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे.(bank closed for 4 days) तसेच शनिवारी १३ मार्चला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १४ मार्चलाही सुट्टी आहे.

    मुंबई : केंद्र सरकारने काही सरकारी बँकांच्या खासगीकरणाची इच्छा जाहीर केली आहे. खासगीकरणाला बँक कर्मचाऱ्यांचा विरोध आहे. त्यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी संपाचे हत्यार उगारले आहे.

    बँकांनी १५ मार्च म्हणजे सोमवारी आणि १६ मार्च म्हणजे मंगळवारी काम बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याचे सरकारी बँक कर्मचाऱ्यांच्या संघटनांनी म्हटले आहे. तसेच शनिवारी १३ मार्चला दुसरा शनिवार असल्याने सुट्टी आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी रविवारी १४ मार्चलाही सुट्टी आहे. त्यामुळे सलग चार दिवस सार्वजनिक क्षेत्रातील बँकांच्या कामकाजावर परिणाम होणार आहे.

    दरम्यान, डिजिटल बँकिंग आणि एटीएममुळे ग्राहकांना अहोरात्र आर्थिक व्यवहार करता येत आहेत. मात्र तरीही ४ दिवस बँका बंद असल्याने नागरिकांना काही प्रमाणात त्रास सहन करावा लागू शकतो.