हिमाचलमध्ये भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई

भाजप विजयी उमेदवार फोडू शकतो या भीतीने धास्तवालेल्या काँग्रेसने उमेदवारांना राजस्थानमध्ये हलवण्याची तयारी सुरु केली आहे. 'ऑपरेशन लोटस'ची शंका आल्याने काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला पाठवण्यात येणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    शिमला : हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) विधानसभा निवडणुकीचा (Election 2022) निकाल आज जाहीर होत आहे. मात्र, भाजप आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढाई दिसत असून हिमाचल प्रदेश विधानसभा (Himachal Assembly Election) निवडणुकीची मतमोजणी सुरू आहे. निवडणुकीचे निकाल लागण्यापूर्वी काँग्रेसला (Congress) घोडेबाजार होण्याची भीती वाटत आहे.

    भाजप विजयी उमेदवार फोडू शकतो या भीतीने धास्तवालेल्या काँग्रेसने उमेदवारांना राजस्थानमध्ये (Rajasthan) हलवण्याची तयारी सुरु केली आहे. ‘ऑपरेशन लोटस’ची शंका आल्याने काँग्रेसने हिमाचल प्रदेशातील आमदारांना राजस्थानला पाठवण्यात येणार आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल (Bhupesh Baghel) आणि ज्येष्ठ नेते भूपेंद्र सिंह हुडा यांच्यावर जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

    काँग्रेस महासचिव प्रियांका गांधी वाड्रा (Priyanka Gandhi) स्वतः परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत. त्या आज शिमल्यात जाण्याची शक्यता आहे. आज निवडणुकीच्या निकालानंतर जनता पुन्हा भाजपला संधी देणार की काँग्रेसची सत्ता कायम राहणार हे महत्त्वाचे ठरणार आहे.