‘व्हेरियंट प्रूफ’ लस विकसित करणार भारत बायोटेक, कंपनीला मिळाला १४९ कोटी रुपयांचा निधी

सेपीकडून संशोधकांना इम्युनोजेन डिझाइन, प्रीक्लिनिकल स्टडीज, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डेव्हलपमेंट आणि फेज 1 क्लिनिकल चाचण्यांसाठी निधी देण्यात येणार आहे. सीईपीआयचे सीईओ रिचर्ड हॅचेट म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या वारंवार येणाऱ्या लाटा आपल्याला आठवण करून देतात की, आपल्याला पुढील अनेक वर्षे व्हायरस सोबत जगावे लागेल.

    नवी दिल्ली – कोरोना विरोधात लस विकसित करणाऱ्या भारत बायोटेकबाबत महत्त्वाची बातमी आहे. सेपीने ने सांगितले की लस निर्माता भारत बायोटेक इंटरनॅशनलला सिडनी युनिव्हर्सिटी आणि स्वित्झर्लंड स्थित एक्सेलजीन यांना USD 19.3 दशलक्ष यांना (सुमारे 149 कोटी) देणार आहे. सेपीची ही रक्कम ‘व्हेरियंट प्रूफ’ लस विकसित करण्यासाठी वापरण्यात येणार आहे.

    सेपीकडून संशोधकांना इम्युनोजेन डिझाइन, प्रीक्लिनिकल स्टडीज, मॅन्युफॅक्चरिंग प्रोसेस डेव्हलपमेंट आणि फेज 1 क्लिनिकल चाचण्यांसाठी निधी देण्यात येणार आहे. सीईपीआयचे सीईओ रिचर्ड हॅचेट म्हणाले की, कोरोना संसर्गाच्या वारंवार येणाऱ्या लाटा आपल्याला आठवण करून देतात की, आपल्याला पुढील अनेक वर्षे व्हायरस सोबत जगावे लागेल. सध्याच्या नवीन प्रकारच्या रोगांचा धोका आहे त्यामुळे व्हेरियंट-प्रूफ SARS-CoV-2 लसींसाठी R&D मध्ये गुंतवणूक करणे ही जागतिक आरोग्य सुरक्षा अत्यावश्यक आहे.