नुपूर शर्माला धमकी दिल्याप्रकरणी भीम सेनेचे प्रमुख सतपाल तंवर यांना अटक

भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी २७ मे २०२२ रोजी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर बोलताना शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद जगभर उमटले आहेत.

    नुपूर शर्मा यांची (Nupur Sharma) जीभ कापणाऱ्यास एक कोटींच बक्षीस जाहीर केल्याप्रकरणी भीम सेनेचे प्रमुख नवाब सतपाल तंवर (Satpal tanvar) यांना अटक केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही कारवाई केली. दिल्ली पोलिसांनी आयपीसीच्या कलम ५०६, ५०९ आणि १५३अ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

    नुपूर शर्माला यांनी प्रेषित मोहम्मद यांच्यासंबंधी एका वृत्तवाहिनीच्या चर्चासत्रात आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी सध्या वादळ उठलयं. भाजपनेही शर्मा यांना भाजपातून निलंबित केले आहे. देशभरात त्यांच्या विरोधात तिव्र विरोध प्रदर्शन करण्यात येतयं. तर, काही काळापूर्वी नुपूर शर्माला सोशल मीडियावर वेगवेगळ्या ठिकाणांहून धमक्या दिल्या जात होत्या. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. काही दिवसांपूर्वी फेसबुकवर एक व्हिडिओ आला होता ज्यामध्ये भीम सेनेचे प्रमुख नवाब सतपाल तंवर यांनी नुपूर शर्माबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. नवाब सतपाल यांनी नुपूर शर्माची जीभ कापणाऱ्याला एक कोटी रुपयांचे बक्षीस देण्याचे जाहीर केले होते. याप्रकरणी स्पेशल सेलने एफआयआर नोंदवलाय. यानंतर दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने गुरुवारी सतपाल तन्वरला अटक केली.

    भारतीय जनता पक्षाच्या नेत्या नुपूर शर्मा यांनी २७ मे २०२२ रोजी एका राष्ट्रीय वृत्तवाहिनीवर बोलताना शर्मा यांनी प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधान केले होते. त्याचे पडसाद जगभर उमटले आहेत. या नतंर आखाती देशांसह इतर अनेक देशांनी भारत देशावर टीका केली. त्यानंतर देशातही वेगवेगवळ्या भागात निदर्शने तसेच काही ठिकाणी हिंसक आंदोलने घडली असून नुपूर शर्मा यांना अटक करण्याची मागणी केली जात आहे.