जम्मू विमानतळावर मोठा स्फोट; बॉम्बशोध आणि फॉरेन्सिक पथक घटनास्थळी दाखल

स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    श्रीनगर : जम्मूमधील विमानतळावर मोठा स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी सकाळी तांत्रिक विभागात हा स्फोट झाला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा स्फोट भारतीय हवाई दलाकडून पूर्ण कामकाज चालवत असलेल्या भागात झाला आहे.

    स्फोट झाल्याची माहिती मिळताच बॉम्ब निकामी करणारं पथक घटनास्थळी दाखल झालं आहे. स्फोटाची माहिती मिळताच पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.

    पहाटे २ वाजता हा स्फोट झाला आहे. स्फोटामध्ये काही जण जखमी झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र हा स्फोट किती मोठा होता याबद्दल अद्याप कोणतीही माहिती मिळालेली नाही.

    Big blast at Jammu airport Bombardment and forensic squad arrived at the scene