
राहुल गांधींना याआधी दिल्ली पोलिसांनी नोटिस पाठवली होती, तसेच याबाबत स्पष्टीकरण द्या असं नोटीसात म्हटलं होतं. मात्र राहुल गांधींनी या नोटीसाला उत्तरच दिले नाही. त्यामुळे आता दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचली आहे. स्पेशल सीपी (कायदा आणि सुव्यवस्था ) सागर प्रीत हुड्डा हे राहुल गांधी यांच्या घरी पोहोचलेत.
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतून (Delhi) एक मोठी बातमी समोर येत आहे. काँग्रेस नेते व खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या घरी दिल्ली पोहचले आहेत. दरम्यान, भारत जोडो यात्रेत (Bharat Jodo Yatra) श्रीनगर येथे वादग्रस्त वक्तव्यावरून राहुल गांधी अडचणीत सापडले आहेत. या प्रकरणी राहुल गांधी यांना दिल्ली पोलिसांनी नोटीस जारी केली होती. एका पीडितेच्या लैंगिक शोषणाप्रकरणी राहुल गांधी यांनी विधान केलं होतं. त्यामुळं पोलिसांनी याचा जाब विचारला असून, त्यांना या पीडितेची माहिती देण्याचं सांगण्यात आलं होतं. मात्र राहुल गांधी यांनी या नोटिशीला काहीच उत्तर दिलं नव्हतं. म्हणून पोलीस अँक्शन मोडमध्ये आले आहेत.
राहुल गांधींच्या घरी दिल्ली पोलीस
दरम्यान, राहुल गांधींना याआधी दिल्ली पोलिसांनी नोटिस पाठवली होती, तसेच याबाबत स्पष्टीकरण द्या असं नोटीसात म्हटलं होतं. मात्र राहुल गांधींनी या नोटीसाला उत्तरच दिले नाही. त्यामुळे आता दिल्ली पोलीस त्यांच्या घरी पोहोचली आहे. स्पेशल सीपी (कायदा आणि सुव्यवस्था ) सागर प्रीत हुड्डा हे राहुल गांधी यांच्या घरी पोहोचले असून, राहुल गांधींना पोलीस चौकशीसाठी ताब्यात घेणार का, याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
काय म्हणाले राहुल गांधी?
भारत जोडो यात्रेदरम्यान श्रीनगरमध्ये बोलताना गांधी म्हणाले की, “जेव्हा मी चालत होतो, तेव्हा खूप स्त्रिया रडत होत्या… त्यांच्यापैकी अनेक होत्या ज्यांनी मला सांगितले की, त्यांच्यावर बलात्कार झाला आहे, त्यांचा विनयभंग झाला आहे. काहींनी सांगितले की, त्यांच्या नातेवाईकांनी त्यांचा विनयभंग केला आहे. जेव्हा मी त्यांना विचारले की, मी पोलिसांना का सांगितले नाही, त्यावर त्या महिला बोलल्या की, पोलिसांना सांगितले तर, आणखी समस्यांना सामोरे जावे लागेल. अजून समस्या, प्रश्न निर्माण होतील, त्यामुळं पोलिसांना न सांगितलेले बरे. असं महिलांनी राहुल गांधींना सांगितले. यावर आपल्या देशाचे वास्तव खूप भयानक आहे, असं राहुल गांधींनी सभेत उल्लेख केला. यावरुन पोलिसांनी गांधींना नोटीस बजावली आहे.