kishor biyani

दिल्ली हायकोर्टाने(delhi high court) फ्यूचर ग्रुपचे सीईओ किशोर बियाणी(kishor biyani) व अन्य यांची मालमत्ता जप्ती तसेच २८ एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचा कोर्टाचा आदेशही रद्द केला. या प्रकरणावर आता ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

  दिल्ली: फ्यूचर रिटेल समुहाला(future retail group) रिलायन्स रिटेलसोबत (reliance retail)झालेल्या २४१७३ कोटींच्या करारास स्थगिती देण्याचा एकल न्यायाधीशांचा निर्णय दिल्ली हायकोर्टाने स्थगित केला आहे. या निर्णयामुळे फ्यूचर ग्रुपचे किशोर बियाणी यांना दिलासा मिळाला आहे.

  मुख्य न्यायाधीश डी.एन. पटेल आणि न्यायमूर्ती जसमित सिंह यांच्या खंडपीठाने रिलायन्ससोबत व्यवसाय करारावर एकल न्यायाधीशांच्या १८ मार्चच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या फ्यूचर समुहाच्या याचिकेवरून अमेझॉनलाही नोटीस बजावली आहे. अमेरिकेतील दिग्गज ई कॉमर्स कंपनी अमेझॉनने या करारास आक्षेप घेतला आहे. हायकोर्टाने फ्यूचर ग्रुपचे सीईओ किशोर बियाणी व अन्य यांची मालमत्ता जप्ती तसेच २८ एप्रिल रोजी न्यायालयात उपस्थित राहण्याचा कोर्टाचा आदेशही रद्द केला. या प्रकरणावर आता ३० एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे.

  हायकोर्टातही सुनावणी प्रलंबित
  वरिष्ठ वकील हरीश साळवे यांनी फ्यूचर ग्रुपतर्फे न्यायालयात युक्तिवाद केला. एकल न्यायाधीशांद्वारे १८मार्च रोजी देण्यात आलेले सर्व आदेश स्थगित करण्यात यावे अशी विनंती त्यांनी न्यायालयाला केली. यापूर्वीच्या खंडपीठानेही एकल न्यायाधीशांच्या पूर्वीच्या आदेशास स्थगिती दिल्याची तसेच हायकोर्टातही हे प्रकरण विचाराधीन असल्याचा युक्तिवाद त्यांनी केला. दुसरीकडे, वरिष्ठ वकील गोपालस सुब्रह्मण्यम यांनी अमेझॉनतर्फे युक्तिवाद केला.

  अमेझॉनच्या याचिकेवरून दिला होता निर्णय
  यापूर्वी न्यायालयाच्या एकल खंडपीठाने अमेझॉनच्या याचिकेवरून निर्णय दिला होता. ज्यात सिंगापूर लवादाच्या २५ ऑक्टोबर २०२० च्या आदेशावर अंमलबजावणी करणे आणि फ्यूचर समुहाला रिलायन्ससोबत २४१७३ कोटींच्या करारास स्थगिती देण्याची विनंती केली होती. याच महिन्यात हायकोर्टाने बियाणींना २८ एप्रिल रोजी न्यालयात उपस्थित होणे तसेच मालमत्तेची माहिती देण्याचेही निर्देश दिले होते.