अनंतनाग हल्ल्याचा मास्टरमाईंड उजैर खानचा खात्मा, दहशतवादी हल्ल्यात भारतीय सैन्याला मोठे यश

Anantnag Encounter : भारतीय सेना मागील सात दिवसांपासून अनंतनागमध्ये दहशतवाद्यांविरोधात शोध मोहीम चालवत आहे. यातच भारतीय सेनेला आता मोठं यश आलं आहे.

    Anantnag Encounter News: जम्मू-काश्मीरमधील अनंतनागमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी कारवाईत भारतीय सैन्याला मोठं यश आले आहे. सुरक्षा दलाने लश्कर-ए-तैयबाचे दहशतवादी आणि या हल्ल्याचा मास्टर माईंड उजैर खान याला ठार केलं आहे.