दारूच्या नशेत ट्रक डायव्हरने  ३० जणांना चिरडले, ८ जणांचा जागीच मृत्यू

मृतांमध्ये ६ मुलांचा समावेश आहे. गावकरी मनोज राय यांनी सांगितले की, घटनास्थळी रस्त्याच्या कडेला मंदिर बांधण्यात आले आहे. ५०-६० वर्षांपासून तेथे पूजा केली जाते. आजपर्यंत अशी कोणतीही घटना तेथे घडलेली नाही. पिढ्यानपिढ्या लोक देवस्थळाची सेवा करत आहेत.

    नवी दिल्ली – दारूबंदी असलेल्या बिहारच्या वैशालीमध्ये दारूच्या नशेत ड्रायव्हरने ३० हून अधिक लोकांना चिरडले. यामध्ये ८ जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये ६ मुलांचा समावेश आहे. हे सर्व लोक पिंपळाच्या झाडाखाली उभे राहून पूजा करत होते. तेवढ्यात १२०च्या वेगाने एक ट्रक आला आणि लोकांना तुडवत निघून गेला. बोनेट आणि झाडाच्या मध्ये २-३ जण दबले गेले. सर्व मृतांचे वय २० वर्षांपेक्षा कमी आहे. रविवारी रात्री नऊच्या सुमारास सुलतानपूर गावाजवळ हा अपघात झाला. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार चालक दारूच्या नशेत होता.

    मृतांचे मृतदेह रस्त्यावर विखुरलेले असल्याने ट्रकचा वेग किती आहे याचा अंदाज लावता येतो. त्यांचे मृतदेह ट्रकच्या पुढच्या भागात अडकले, ते काढण्यासाठी ट्रकला गॅस कटरने कापावे लागले. यानंतरही त्यांचे अनेक अवयव ट्रकमध्ये लटकलेले होते.

    मृतांमध्ये ६ मुलांचा समावेश आहे. गावकरी मनोज राय यांनी सांगितले की, घटनास्थळी रस्त्याच्या कडेला मंदिर बांधण्यात आले आहे. ५०-६० वर्षांपासून तेथे पूजा केली जाते. आजपर्यंत अशी कोणतीही घटना तेथे घडलेली नाही. पिढ्यानपिढ्या लोक देवस्थळाची सेवा करत आहेत.

    लोकांना धडकल्यानंतर ट्रक पिंपळाच्या झाडावर आदळला. चालक जखमी अवस्थेत स्टेअरिंगमध्ये अडकला. स्थानिक नागरिक आणि मृतांच्या नातेवाईकांशी दिव्य मराठीशी चर्चा केली. ट्रक ड्रायव्हर मद्यधुंद अवस्थेत होता, असे स्थानिकांचे म्हणणे आहे.