बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार हे एनडीएत येणार; ‘या’ केंद्रीयमंत्र्यांचा दावा, चर्चांना उधाण

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोदी सरकारविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2024 च्या आगामी निवडणुकांसाठी देशातील सर्व विरोधी पक्षनेते एकत्र आले आहेत. यावेळी नितीश कुमार हे कधीही एनडीएमध्ये (NDA) जाऊ शकतात, असा दावा मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे.

    नवी दिल्ली : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार (Nitish Kumar) यांनी मोदी सरकारविरोधात आघाडी उभी करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. 2024 च्या आगामी निवडणुकांसाठी देशातील सर्व विरोधी पक्षनेते एकत्र आले आहेत. यावेळी नितीश कुमार हे कधीही एनडीएमध्ये (NDA) जाऊ शकतात, असा दावा मोदी सरकारमधील केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी केला आहे. रामदास आठवले यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

    रोहिणी समितीच्या अहवालाबाबत आठवले म्हणाले की, देशात जातीच्या आधारे जनगणना झाली पाहिजे. मागासवर्गीयांसोबत सर्वसामान्य जातींचीही जनगणना व्हायला हवी. रोहिणी समितीचा अहवाल अद्यापही जाहीर झालेला नाही. परंतु, मागासवर्गीयांना तीन भागात वाटून आरक्षणाबाबत निर्णय घ्यायला हवा. ज्याप्रकारे महाराष्ट्रात बदल झाला आहे. त्याचप्रमाणे बिहारमध्येही बदल व्हायला हवा, असे आठवले म्हणाले.

    ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात

    नितीश कुमार हे आधीही आमच्यासोबत राहिलेले आहेत. तसेच ते कधीही आमच्यासोबत येऊ शकतात. नितीश कुमार यांनी विरोधी आघाडीच्या मुंबईत होणाऱ्या बैठकीला जाऊ नये. नितीश कुमार यांनी बिहारमध्ये केलेलं विकासकामे सहजपणे दृष्टीस पडतं. आधी बिहारमध्ये चांगले रस्ते नव्हते. परंतु त्यांच्या नेतृत्वात खूप चांगलं काम सुरु आहे.

    – रामदास आठवले, केंद्रीय मंत्री