विमानात बसलो तेव्हा सर्वकाही ठिक…आणि उतरल्यावर घडला ‘हा’ विचित्र प्रकार

बिहारमधील सत्तांतरवर शहानवाझ हुसेन (Shahnawaz Hussain) यांनी खुमासदार व गंमतशीर प्रतिक्रिया दिली आहे. शहानवाझ हुसेन हे मागील सरकारच्या काळात उद्योगमंत्री होते. एका कामानिमित्त ते बिहारमधून विमानातून बसून दिल्लीला आहे, तेव्हा ते मंत्री होते, मात्र जेव्हा विमानातून खाली उतरले तेव्हा त्यांचे मंत्रिपद गेले होते हे त्यांना कळले.

    नवी दिल्ली : जसे राज्यात सत्तांतर झाले आहे, तसे आता बिहारमध्ये (Bihar) सुद्धा राजकीय भूकंप झाला आहे, जनता दलचे नितीशकुमार (JDU nitishkumar) यांनी भाजपाची (BJP) साथ सोडत लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र तेजस्वी यादव (Tejswai Yadav) राष्ट्रीय जनता दलसोबत सरकार स्थापन केलं आहे. त्यामुळं भाजपा महाराष्ट्रात मंत्रिमंडळ विस्तार व शपथविधी यात व्यस्त असताना, नितीशकुमारांनी करेक्ट कार्यक्रम केला असं बोललं जात आहे. दरम्यान यावरुन विविध प्रतिक्रिया समोर येत आहेत.

    दरम्यान, आता बिहारमधील सत्तांतरवर शहानवाझ हुसेन (Shahnawaz Hussain) यांनी खुमासदार व गंमतशीर प्रतिक्रिया दिली आहे. शहानवाझ हुसेन हे मागील सरकारच्या काळात उद्योगमंत्री होते. एका कामानिमित्त ते बिहारमधून विमानातून बसून दिल्लीला आहे, तेव्हा ते मंत्री होते, मात्र जेव्हा विमानातून खाली उतरले तेव्हा त्यांचे मंत्रिपद गेले होते हे त्यांना कळले. यावर त्यांनी प्रतिक्रिया देताना म्हटलं की, मी जेव्हा विमानात बसलो तेव्हा मंत्री होतो, मात्र जेव्हा मी विमानातून दिल्लीत खाली उतरलो तेव्हा मी मंत्री नाही ते कळले. आणि मला धक्काच बसला. असं हुसेन म्हणाले.