तामिळनाडू आहे की तालिबान! हिंदी बोलणाऱ्या बिहारी मजुरांना अमानुष मारहाण, 12 जणांचा मृत्यू झाल्याचा दावा, मुख्यमंत्र्यांकडे मदतीची याचना

हिंदी भाषिक लोकांनी तेथून तामिळनाडुमधुन हिंसाचाराचे व्हिडिओ पाठवून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मदतीच आवाहन केले आहे.

तामिळनाडूमध्ये (Tamilnadu) हिंदी भाषा बोलणाऱ्यांचा राग केला जातो असं तुमच्या बऱ्याचदा ऐकण्यात आलं असेल. मात्र,तामिळनाडुमधुन सध्या एक बातमी समोर येत आहे ज्यामुळे ऐकलेलं खरं आहे का? असा प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तामिळनाडुमध्ये बिहारी मजुरांना हिंदी बोलल्यामुळे तालिबानी शिक्षा दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. वेतनावरून निर्माण झालेल्या वादात हिंदी भाषिक मजुरांना मारहाण करण्यात आली आहे. काही तरुणांनी सांगितले की, या लोकांनी 12 मजुरांना एका खोलीत बंद करून फाशी दिली. 15 हून अधिक मजूर ठार झाल्याचा दावा केला जात आहे. व्हिडिओ जारी करून मजुरांनी पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांकडे मदतीचे आवाहन केले आहे.

नेमकं प्रकरण काय?

माहितीनुसार, तामिळनाडूमध्ये काम करणाऱ्या बिहारमधील लोकांनी सांगितले की, तामिळनाडू हिंदी भाषिकांवर अन्याय होत आहे. आतापर्यंत झालेल्या हिंसाचारात दोन लोकांचा मृत्यू झाला आहे आणि 50 हून अधिक जखमी झाले आहेत. मृत हे मधुबनी जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. स्थानिक तमिळ लोक बिहारी मजुरांवर कुऱ्हाडी आणि काठ्यांनी हल्ला करत आहेत. यामुळे त्यांना लपून बसावे लागते.

तामिळनाडुच्या शिवकट आणि तिरपुरा भागात होत आहेत हल्ले 

तामिळनाडूमध्ये अडकलेल्या बिहारमधील सोनू या मजुराने सांगितले की,शिवकट आणि तिरपुरा हे औद्योगिक क्षेत्रात. येथे जास्तीत जास्त लोखंडाचे कारखाने आहेत. येथे बिहारमधील मजूर वेल्डिंगच्या काम करतात. सोनूने सांगितले की, मजुरांवरी हल्ल्याचे प्रकार शिवकट आणि तिरपुरा भागातील आहेत. व्हिडिओ बनवून फोटो व्हायरल करण्यासाठी येथे मजुरांना शोधून मारहाण  केली जात आहे. लोकांना घरातून बाहेर पडूही दिले जात नाही. पोलीस आणि प्रशासनही मदत करत नाही आहे. त्यामुळे काही हिंदी भाषिक लोकांनी तेथून तामिळनाडुमधुन हिंसाचाराचे व्हिडिओ पाठवून मुख्यमंत्री नितीश कुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांना मदतीच आवाहन केले आहे.

मुख्यमंत्री नितीश कुमारांनी घेतली दखल 

मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निर्देशानंतर बिहारचे मुख्य सचिव तामिळनाडूच्या मुख्य सचिवांशी आणि बिहारच्या डीजीपी तामिळनाडूच्या डीजीपीशी बोलले आहे. दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले आहे. बिहारचे मजूर जे तिथे अडकले आहेत. त्यांना सुरक्षा दिली जाईल. व घरोघरी पोहोचण्याचा प्रयत्न केला जाईल.