bill gates

मायक्रोसॉफ्टचे (Microsoft) संस्थापक बिल गेट्स (Bill Gates Emotional Message On Twitter) आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, असं वाटतं होतं की आता सगळं पूर्ववत होईल, पण तसं नाहीये. आता आपण महामारीच्या सर्वात वाईट काळात प्रवेश करणार आहोत. ओमायक्रॉनचा फटका आपल्या प्रत्येकालाच बसणार आहे. माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांना तो बसला आहे. मी माझ्या सुट्टीचं सगळं नियोजन रद्द केलं आहे.

    सध्या जगभरात ओमायक्रॉनमुळे (Omicron) सर्वच देशांची चिंता वाढली आहे. या नव्या व्हेरिएंटबद्दल मायक्रोसॉफ्टचे संस्थापक बिल गेट्स (Bill Gates Worried About Omicron Spread) यांनीही चिंता व्यक्त केली असून जगभरातील नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन (Bill Gates Emotional Message) त्यांनी केलं आहे. आपल्या अगदी जवळच्या मित्रांनाही कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटची लागण होत असल्याने काळजीत असलेल्या बिल गेट्स यांनी आपल्या फॉलोअर्सना काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.

    गेट्स आपल्या ट्विटमध्ये म्हणतात, असं वाटतं होतं की आता सगळं पूर्ववत होईल, पण तसं नाहीये. आता आपण महामारीच्या सर्वात वाईट काळात प्रवेश करणार आहोत. ओमायक्रॉनचा फटका आपल्या प्रत्येकालाच बसणार आहे. माझ्या सगळ्या जवळच्या मित्रांना तो बसला आहे. मी माझ्या सुट्टीचं सगळं नियोजन रद्द केलं आहे. इतर कोणत्याही विषाणूपेक्षा अधिक वेगाने ओमायक्रॉन फैलावत आहे. त्याचा प्रादुर्भाव लवकरच जगातल्या प्रत्येक देशात दिसून येईल. पण सगळ्यात मोठी गोष्ट ज्यापासून आपण अज्ञात आहोत, ती म्हणजे हा विषाणू किती गंभीररित्या परिणाम करू शकतो. त्यामुळे जोपर्यंत आपल्याला या विषाणूबद्दल पूर्ण माहिती मिळत नाही, तोवर आपल्याला या विषाणूपासून जास्तीत जास्त खबरदारी घ्यायला हवी. डेल्टापेक्षा निम्मा जरी धोका या व्हेरिएंटमुळे असेल तरी आपण आत्तापर्यंतच्या सगळ्यात वाईट काळात जाऊ. कारण हा विषाणू खूप वेगाने पसरत आहे.


    बिल गेट्स पुढे म्हणतात, दरम्यानच्या काळात, आपण सर्वांनी एकमेकांकडे लक्ष देणं विशेषतः ज्यांना या विषाणूचा धोका अधिक आहे, अशांकडे लक्ष देणं गरजेचं आहे. यासाठी आपण मास्क लावणे, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळणे,लसीकरण करून घेणे, बूस्टर डोस घेणे अशा उपायांचं पालन करायला हवं.

    शेवटी बिल गेट्स म्हणाले, “येथे चांगली बातमी अशी आहे की, ओमायक्रॉन इतक्या वेगाने फिरतो की एकदा तो देशात प्रबळ झाले की, तिथली लाट ३ महिन्यांपेक्षा कमी काळ राहते. हे कायमचे राहणार नाही. एखाद्या दिवशी महामारीचा अंत होईल आणि आपण एकमेकांची जितकी काळजी घेऊ तितक्या लवकर ती वेळ येईल”.