राजस्थानातील झालवाडमध्ये बर्ड फ्लूचे संकट; असंख्य कावळ्यांचा मृ्त्यू

आजवर या भागात १०० पेक्षा अधिक कावळ्यांचा मृत्यू झाल्याची तर अधिकांश कावळे आजारी असल्याची माहिती प्रशासनाने दिली.

  • १ कि.मी. परिसरात कर्फ्यू

जयपूर. राजस्थनातील जोधपूर पाठोपाठ आता झालवाडमध्येही मोठ्या प्रमाणात कावळ्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या कावळ्यांचा एव्हियन इन्फ्लूएंझामुळेच (एक प्रकारचा बर्ड फ्लू) मृत्यू झाल्याची पुष्टी झाल्यानंतर राज्यातील पोल्ट्री फार्म संचालकांमध्ये दहशत पसरली आहे. या घटनेनंतर झालावाड प्रशासनाने राडीतील बालाजी क्षेत्रातील एक कि.मी. परिसरात कर्फ्यू जाहीर केला आहे. बालाजी क्षेत्रात गेल्या २५ डिसेंबरपासून कावळे मृत्युमुखी पडत आहेत. आजवर या भागात १०० पेक्षा अधिक कावळ्यांचा मृत्यू झाल्याची तर अधिकांश कावळे आजारी असल्याची माहिती प्रशासनाने दिली. मृतक कावळ्यांचे नमूने भोपाळ येथील प्रयोगशाळेतही पाठविण्यात आले आहेत.

पोल्ट्री फार्म, दुकानातून घेणार नमूने
झालावाडमध्ये अशा प्रकारची ही घटना पहिलीच आहे. दरम्यान गुरुवारी कोटा येथून तज्ज्ञांचे एक पथक झालावाड येथे दाखल झाले आहे. हे पथक कावळ्यांची तपासणी करतील. दरम्यान या घटनेनंतर पोल्ट्री फॉर्म-दुकानांतून सॅम्पल घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. फ्लूमुळे पोल्ट्री फार्मदेखील संक्रमित झाले असल्याची शंका व्यक्त करीत त्यांनी पोल्ट्री फार्म व दुकानेही बंद करण्यात आल्याची माहिती दिली.