कर्नाटकात भाजपचे वर्चस्व, हरयाणात काँग्रेसला धक्का

राज्यसभे(Rajyasabha Election)च्या चार राज्यातील १६ जागांसाठी निवडणूक पार पडली. त्यामध्ये महाराष्ट्र (Maharashtra), हरियाणा (Haryana), कर्नाटक (Karnataka) आणि राजस्थान(Rajasthan)चा निकाल जाहीर झाला. एकूण ५७ जागांसाठी निवडणूक झाली असून ४१ जागा बिनविरोध (Unopposed) झाल्या. महाराष्ट्रात जवळपास २४ वर्षांनंतर राज्यसभेसाठी मतदान झाले.

  कर्नाटकमध्ये राज्यसभेच्या चार जागांसाठीच्या निवडणुकीमध्ये भाजप(BJP)चे तीन आणि काँग्रेस(Congress)चा एक उमेदवार निवडून आला आहे. भाजपच्या वतीने केंद्रीय मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitaraman) यांना पहिल्या पसंतीची ४६ मते, जग्गेश भाजप ४६ आणि लहर सिंह सिरोया यांना ३३ मते मिळाली असून काँग्रेसचे जयराम रमेश(Jayram Ramesh) ही निवडून आले आहेत. दरम्यान, क्रॉस वोटिंगमुळे जेडीएस(JDS)चे नुकसान झाले आहे.

  सुभाष चंद्रा यांना पराभूत
  राजस्थानमध्ये काँग्रेसने ४ पैकी ३ जागा जिंकत भाजपला मोठा धक्का दिला. राज्यसभा निवडणुकीत काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, मुकुल वासनिक आणि प्रमोद तिवारी विजयी झाले आहेत. तर, भाजपचे घनश्याम तिवारी विजयी झाले आहेत. दरम्यान, भाजपसमर्थित अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा (Subhash Chandra) यांना पराभवाला सामोरे जावे लागले आहे.

  अजय माकन यांचा पराभव
  हरियाणामध्ये दोन जागांवर भाजप आणि काँग्रेस उमेदवार प्रत्येकी एका जागेवर विजयी झाले आहेत. भाजपकडून कृष्ण पाल पंवार आणि अपक्ष उमेदवार कार्तिकेय शर्मा विजयी झाले आहेत. काँग्रेसचे एक मत बाद ठरल्याने अजय माकन (Ajay Makan) यांचा पराभव झाला आहे.