भाजपाने ‘समाजवाद’ आणि ‘धर्मनिरपेक्ष’ हे शब्द राज्यघटनेतून वगळले; काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांचा गंभीर आरोप, म्हणाले…

राज्य घटनेतून Secular-Socialist शब्द वगळल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. त्यांच्या या आरोपाने देशभरात एकच खळबळ उडाली. तर त्यांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार भाजपने केला आहे.

  नवी दिल्ली : नव्या संसद इमारतीमध्ये कामकाजाचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यात लोकसभेत आज महिला आरक्षण विधेयकावर (Women Reservation) चर्चा होत असताना, आता समाजवाद आणि धर्मनिरपेक्ष हे शब्द भारतीय राज्यघटनेतून (Constitution Of India) वगळल्याचा आरोप काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं केलाय. त्यामुळं नवीन वादाला तोंड फुटले आहे. राज्य घटनेतून Secular-Socialist शब्द वगळल्याचा आरोप काँग्रेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. त्यांच्या या आरोपाने देशभरात एकच खळबळ उडाली. तर त्यांचे हे आरोप बिनबुडाचे असल्याचा पलटवार भाजपने केला आहे. (BJP dropped the words socialism and secular from the Indian constitution, Congress leader Adhir Ranjan Chowdhury made a serious allegation)

  भाजप देशावर मनुस्मृती लादणार?

  राज्यघटनेच्या इंग्रजी प्रतमध्ये हा प्रकार झाल्याचा आरोप चौधरी यांनी केला. तर राज्यघटनेच्या हिंदी भाषेतील प्रतीमध्ये धर्मनिरपेक्ष आणि समाजवादी हे शब्द जैसे थे असल्याचे त्यांनी सांगितले. हा मुद्दा त्यांनी संसदेत उठविण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना बोलण्याची संधी देण्यात आली नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. नवीन संसद भवनात खासदारांना राज्यघटनेची प्रत देण्यात आली. या राज्य घटनेतील प्रस्तावनेतून Secular-Socialist हे शब्द वगळल्याचा आरोप काँग्रेसचे वरिष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांनी केला. तसेच भाजपा राज्य घटना बदलण्याचा घाट घालत आहे. भाजप देशावर मनुस्मृती लादणार असल्याचा आरोप काँग्रेससह विरोधी गटातील अनेक नेत्यांनी केला आहे.

  SC, ST, OBC महिलांना वेगळं आरक्षण द्या – मायावती

  दरम्यान, संसदेच्या नवीन इमारतीत काल महिला आरक्षणावरुन विरोधक व सत्ताधारा यांच्यात गदारोळ झाला. त्यामुळं काल कामकाज तहकूब करावे लागले. यानंतर आज दुसऱ्या दिवशी या विधेयकाला काँग्रेसनं पाठिंबा दिला. तर महिला आरक्षणावर चर्चेत एससी, एसटी आणि ओबीसी महिलांना वेगळं आरक्षण ३३ टक्क्यांपेक्षा द्या, अशी मागणी मायावतींनी केलीय. त्यामुळं यावर देखील चर्चा होत आहे. SC, ST, OBC महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करावे, असं मायावती म्हणाल्या. दरम्यान, मायावतींच्या मागणीवर सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहवे लागेल.

  महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी

  सोनिया गांधी पुढे म्हणाल्या, भारतीय महिलांनी सर्वांच्या कल्याणासाठी काम केले आहे. स्त्रीच्या सहनशीलतेचा अंदाज लावणे खूप कठीण काम आहे. भारतीय महिलांनी कधीही तक्रार केलेली नाही. महिलांची सहनशक्ती समुद्राएवढी आहे. लवकरात सवकर आरक्षण लागू करावे. महिला आरक्षणासोबत जातनिहाय जनगणना देखील करा नाहीतर एससी आणि एसटींची संख्या कशी कळणार? तसेच लवकरात सवकर आरक्षण लागू करावे असे देखील त्या सोनीया गांधी यावेळी म्हणाल्या.