rajnath singh

ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये विरोधी पक्षांची बैठक घेतली आहे. (mamata banerjee delhi meeting) विरोधकांच्या या बैठकीनंतर आता भाजपाच्या हालचानीन वेग आला असून, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची (presidential election) जबाबदारी संरक्षण मंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यावर सोपवली आहे.

    नवी दिल्ली : राष्ट्रपती रामनाथ कोविंद (Ramnath Kovind) यांचा कार्यकाळ 24 जुलै रोजी संपणार आहे. त्यामुळं निवडणूक आयोगाने (Election commission) देशाच्या नव्या राष्ट्रपतींच्या निवडणुकीचा (presidential election) कार्यक्रम जाहीर केला आहे. पुढील राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवार 29 जूनपर्यंत अर्ज भरू शकतील. 30 जून रोजी उमेदवारी अर्जांची (Candidate Application) छाननी होणार आहे. 2 जुलैपर्यंत उमेदवारांना अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर 18 जुलै रोजी मतदान होणार असून 21 जुलै रोजी मतमोजणी (21 July result) होणार आहे.

    दरम्यान, राष्ट्रपती पदाची निवडणूक १८ जुलै (presidential election 18 July 2022)  रोजी होणार असल्यामुळं विरोधी पक्ष चांगलीच मोर्चे बांधणी करताना दिसत आहे. याबाबत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamta Banarjee) यांनी सर्व विरोधकांना एकत्र करण्याचे प्रयत्न सुरु केलेत. याबाबतीत बॅनर्जी यांनी देशातील प्रमुख पक्ष्यांच्या नेत्यांना पत्र पाठवून बैठकीसाठी आमंत्रण दिले होते. या पार्श्वभूमीवर ममता बॅनर्जी यांनी बुधवारी दिल्लीच्या कॉन्स्टिट्यूशन क्लबमध्ये विरोधी पक्षांची बैठक घेतली आहे. (mamata banerjee delhi meeting) विरोधकांच्या या बैठकीनंतर आता भाजपाच्या हालचानीन वेग आला असून, राष्ट्रपतींच्या निवडणुकीची (presidential election) जबाबदारी संरक्षण मंत्री व भाजपाचे वरिष्ठ नेते राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांच्यावर सोपवली आहे.

    राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपकडून (BJP) राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीची जबाबदारी राजनाथ सिंह आणि पक्षप्रमुख जे.पी. नड्डा (Rajnath Singh and J P Nadda) यांच्यावर मोठी जबाबदारी दिली आहे. ते निवडणुकीपूर्वी राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारावर एकमत करण्यासाठी इतर पक्षांशी चर्चा करणतील. राजनाथ सिंह यांनी काँग्रेसचे मल्लिकार्जून खरगे, टीएमसीच्या ममता बॅनर्जी, आणि सपाचे अखिलेश यादव यांच्यासह अनेक प्रमुख नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. (Rajnath Singh will meet several prominent leaders including Congress Mallikarjun Kharge, Mamata Banerjee and SP’s Akhilesh Yadav) त्यामुळं राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या गोटात हालचालींना वेग येताना दिसत आहे. भाजपकडून वरिष्ठ नेते आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी विरोधी पक्षातील प्रमुख नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे.