भाजपात घराणेशाही नाही, सेवा, संकल्प आणि समर्पणावर पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जोर, राष्टीय कार्यकारिणीत विजयासाठी कार्यकर्त्यांना दिले पाच मंत्र

पंजाबमध्ये सर्व जागांवर भाजपा उमेदवार देणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली, तर सर्वाधिक लक्ष असलेल्या उ. प्रदेश निवडणुकांसाठी योगींना बैठकीत विशेष मनहत्त्व दिल्याचे लक्षात आले. बैठकीत सर्वात पहिला राजकीय प्रस्ताव ठेवण्याचा मान योगींना देण्यात आला. सरकारने केलले काम जनतेपर्यंत पोहचवणे आणि पक्ष संघटनेचा विस्तार करणे, या दोन गोष्टींवर बैठकीत भर देण्यात आला.

    नवी दिल्ली- दिवाळी संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पार पडलेल्या भाजपाच्या राष्टीय कार्यकारिणीच्या (BJP national executive)बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi)आगामी पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांसाठी (assembly elections in five states)  कार्यकरत्यांना पाच मंत्र दिले आहेत. त्याचबरोबर भाजपा हा घराणेशाही असलेला पक्ष नाही, असे सांगतानाच अप्रत्यक्षपणे काँग्रेस (Congress) आणि गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडले आहे. घराणेशाही नसल्याने भाजपा इतर पक्षांपेक्षा वेगळा पक्ष आहे आणि सेवा, संकल्प आणि समर्पण या तीन महत्त्वाच्या बाबींमुळे पक्षाने आत्तापर्यंत एवढी मोठी झेप घेतल्याचेही त्यांनी सांगितले. अधिकाधिक जनतेत जून काम केल्याने अनुभव मिळेल आणि ज्ञान वाढेल, असा सल्लाही त्यांनी कार्यकरत्यांना दिला.

    दिल्लीत पार पडलेल्या या बैठकीला पक्षाचे सर्व मोठे नेते उपस्थित होते. उ. प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथही बैठकीत सहभागी झाले होते. पुढील वर्षी उ. प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा, मणिपूर या पाच राज्यात निवडणुका होणार आहेत.नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत भाजपाची कामगिरी प्रश्नचिन्ह निर्माण करणारी आहे, अशा स्थितीत या राष्ट्रीय कार्यकारिणीत विजयासाठीची रणनीतीची चर्चा करण्यात आली.

    पंजाबमध्ये सर्व जागांवर भाजपा उमेदवार देणार असल्याची घोषणा या बैठकीत करण्यात आली, तर सर्वाधिक लक्ष असलेल्या उ. प्रदेश निवडणुकांसाठी योगींना बैठकीत विशेष मनहत्त्व दिल्याचे लक्षात आले. बैठकीत सर्वात पहिला राजकीय प्रस्ताव ठेवण्याचा मान योगींना देण्यात आला. सरकारने केलले काम जनतेपर्यंत पोहचवणे आणि पक्ष संघटनेचा विस्तार करणे, या दोन गोष्टींवर बैठकीत भर देण्यात आला. आगामी निवडणुका जिंकण्याचा संकल्प अजेंड्यात अग्रस्थानी होता. या पाचही राज्यातील परिस्थितीची समीक्षाही या बैठकीत करण्यात आली. पाच राज्यांतील चार भाजपाच्या मुख्यमंत्र्यांनी आणि पाच राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांनी सुरु असलेल्या तयारीची माहिती या बैठकीत दिली.

    या बैठकीत पाच मुद्द्यांवर भर देण्यात आला.

    • जनतेत विश्वास निर्माण करण्याची गरज

    भाजपाला सर्वाधिक अवघड निवडणूक ही पंजाबची आहे. या राज्यात भाजपाला कोणताही मित्रपक्ष सद्यस्थितीत नाही. कृषी कायद्याला होणाऱअया विरोधापेक्षा शिखांची अस्मिता हाच मुख्य मुद्दा असेल असे भाजपा श्रेष्ठींना वाटते आहे. भाजपाने शिखांसाठी केलेल्या विकासकामांवर या बैठकीत जोर देण्यात आल्याचे पाहायला मिळाले. जनतेत विश्वासाचा पूल निर्माण करण्याची गरज यावेळी पंतप्रधानांनी व्यक्त केली. तसचे आगामी काळात पक्षाचा विस्तार व्हायला हवा, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

    • जम्मू काश्मीरमधील कामगिरी पोहचवा

    कार्यकारिणीत जम्मू-काश्मीरवरही चर्चा झाली. कलम ३७० हटविल्यानंतर काश्मीर आता दहशतवाद सोडून विकासाच्या मार्गावर असल्याचा पुनरुच्चार बैठकीत करण्यात आला. गेल्या दोन वर्षांत या प्रदेशात पर्यटन आणि गुंतवणुकीत वाढ झाल्याचेही ठामपणे सांगण्यात आले. ३७० हटविल्यानंतर येथील हत्यांमध्ये घट झाल्याचे जे पी नड्डा यांनी सांगितले. तर जम्मू काश्मीरसाठी २८,४०० कोटींच्या उद्योग प्रोत्साहन योजनेचा उल्लेखही करण्यात आला.

    • प. बंगाल निवडणूक सकारात्मक असल्याचे ठसवा

    बैठकीत प. बंगाल निवडणुकांवरही मंथन झाले. राज्यातील पक्ष कार्यकर्त्यांच्या मागे पक्ष उभा आहे आणि त्यांच्यावर अन्याय होऊ देणार नाही असे श्रेष्ठींकडून सांगण्यात आले. ज्या राज्यात भाजपा नव्हतीच तिथे ती आता ३८ टक्के पोहचली आहे, हे मोठे यश असल्याचे या बैठकीत सांगण्यात आले. पराभवाची नकारात्मक बाजू सोडून, पक्षवाढीची सकारात्मक बाजू जनतेत नेण्याची गरजही व्यक्त करण्यात आली.

    • केंद्र सरकारची तीन मोठी कामे जनतेत पोहचवा

    बैठकीत कोरानाकाळात सरकारने केलेल्या चांगल्या कामगिरीची प्रशंसा करण्यात आली. कोरोना संकट काळातही १०० कोटींहून अधिक लसीकरण आणि ८० कोटी जनतेला मोफत रेशन धान्य, ही सरकारची मोठी कामगिरी जनतेपर्यंत जायला हवी, अशी मांडणी करण्यात आली. कोरोना काळातील कामगिरी हा येत्या निवडणुकात महत्त्वाचा मुद्दा ठरण्याची शक्यता आहे. पेम किसान सन्मान योजेनेद्वारे लाखो शेतकऱ्यांना केलेली मदत जनतेपर्यंत जायला हवी, सेही सांगण्यात आले. यामुळे शेतकऱ्यांचा रोष कमी करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल.

    • विरोधकांचा खोटेपणा जनतेसमोर आणा

    बैठकीत सर्वात शेवटी विरोधकांचा खोटेपणा जनतेसमोर आणा असे सांगण्यात आले. विरोधकांची सत्ता असलेल्या राज्यांनी आत्तापर्यंत इंधनावरील वॅट कमी केलेला नाही, हे जनतेला सांगा. लसीकरणाबाबत विरोधकांनी अफवा पसरवल्या, सरकारवर टीका केली, संपूर्ण कोरोना काळात विरोधकांनी घाणेरडे राजकारण केले, हे मुद्दे जनतेसमोर मांडण्याची गरज व्यक्त करण्यात आली. विरोधकांची क्षुद्र मानसिकता जनतेसमोर यायला हवी, असा सूर नेत्यांनी लावला.