भाजपच्या बड्या नेत्याने केला आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार, 6 महिन्यांपासून करत होता बलात्कार

पोलिसांनी संजय मिश्रा याला अटक करून तुरुंगात पाठवले. तुरुंगात जाण्यापूर्वी संजय मिश्रा यांनी स्वत:ला निर्दोष घोषित केले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संजय मिश्रा याला अटक केली आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी सकाळी चक्रधरपूरचे प्रभारी डीएसपी दिलीप खालको पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि स्टेशन प्रभारी प्रवीण कुमार यांच्यासह आरोपी आणि पीडितेची स्वतंत्रपणे चौकशी केली.

    भाजपच्या एका नेत्यावर आंतरराष्ट्रीय महिला खेळाडूवर बलात्कार केल्याचा खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. हे प्रकरण झारखंडमधील असुन, भारतीय जनता पक्षाचे पश्चिम सिंगभूम मीडिया प्रभारी संजय मिश्रा यांच्यावर बलात्काराचा आरोप आहे. या आरोपानंतर चक्रधरपूर पोलिसांनी मिश्रा यांना अटक करून तुरुंगात पाठवले.

    याबाबत माहिती देताना चक्रधरपूरचे डीएसपी दिलीप खलको यांनी मंगळवारी सांगितलं, आरोपी आणि पीडित महिलेची वेगवेगळी चौकशी केल्यानंतर, आरोपी संजय मिश्राला अटक करण्यात आली आहे. डीएसपी दिलीप खलको यांनी सांगितलं की, पीडित तरुणीने लावलेल्या आरोपात तथ्य असल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

    पोलिसांनी संजय मिश्रा याला अटक करून तुरुंगात पाठवले. तुरुंगात जाण्यापूर्वी संजय मिश्रा यांनी स्वत:ला निर्दोष घोषित केले. पीडित महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी संजय मिश्रा याला अटक केली आणि त्यानंतर त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. मंगळवारी सकाळी चक्रधरपूरचे प्रभारी डीएसपी दिलीप खालको पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले आणि स्टेशन प्रभारी प्रवीण कुमार यांच्यासह आरोपी आणि पीडितेची स्वतंत्रपणे चौकशी केली.

    गेल्या एप्रिल महिन्यापासून संजय मिश्रा या महिला खेळाडूला ब्लॅकमेल करून तिच्यावर बलात्कार करत असल्याचे वृत्त आहे. संजयने महिला खेळाडूचे आक्षेपार्ह छायाचित्र काढले होते. हेच चित्र दाखवून तो दररोज महिला खेळाडूला ब्लॅकमेल करायचा आणि स्थानिक हॉटेलमध्ये बोलावून तिच्यावर बलात्कार करायचा. मात्र, ही बाब संजयच्या पत्नीला समजल्याने दोघांमध्ये भांडण झाले.