उत्तर प्रदेशात भाजपला पुन्हा अच्छे दिनची शक्यता? पाहा काय सांगतोय एबीपी सी-वोटर सर्वे

यूपीमध्ये विधानसभा निवडणुकीसाठी अवघे काही महिने उरले आहेत. उत्तर प्रदेशात थंडीच्या मोसमातही राजकीय राजकीय वातावरण तापलं आहे. भाजप असो वा समाजवादी पक्ष, काँग्रेस असो वा एआयएमआयएम, आरएलडी असो वा मायावतींचा बसपा सर्वच पक्ष सत्तेसाठी आपली संपूर्ण ताकद पणाला लावत आहेत. असं म्हणतात केंद्रातील सत्तेचा मार्ग यूपीच्या रस्त्यांवरून जातो. त्यामुळं उत्तर प्रदेश काबीज करण्यासाठी सर्वच पक्ष मैदानात उतरले आहेत.

    यूपीमध्ये कोणाचे सरकार बनणार, ते आगामी काळात ईव्हीएममध्ये कैद होणार आहे. मात्र, त्याआधी सी व्होटरसह एबीपी न्यूज सातत्याने लोकांमध्ये जाऊन जनमत काय आहे हे जाणून घेत आहे. लोकांना अनेक प्रश्न विचारले जात आहेत, त्यापैकी एक प्रश्न होता की यूपीमध्ये कोण जिंकेल असे तुम्हाला वाटते?

    २३ डिसेंबर रोजी करण्यात आलेल्या या सर्वेक्षणात ४८ टक्के लोकांनी यूपीमध्ये भाजप पुन्हा सरकार स्थापन करू शकते असे सांगितले. तर ३१ टक्के लोकांनी समाजवादी पक्षाचा विजय होईल असे सांगितले. मायावतींची बसपा निवडणूक जिंकू शकते, असे ७ टक्के लोकांनी सांगितले. काँग्रेससाठी ६ टक्के लोकांनी सहमती दर्शवली. दुसऱ्यांचे सरकार स्थापन होईल, असे २ टक्के लोकांनी सांगितले. राज्यात त्रिशंकू विधानसभा होईल, असा विश्वास ३ टक्के लोकांना आहे. ३ टक्के लोकांनी कोणत्याही प्रकारे उत्तर दिले नाही.

    यापूर्वी २० डिसेंबर रोजी जेव्हा यूपीच्या जनतेला हाच प्रश्न विचारण्यात आला होता, तेव्हाही ४८ टक्के लोकांनी भाजप यूपीमध्ये परत येईल असे म्हटले होते. अखिलेश यादव सरकार स्थापन करतील असा ३१ टक्के लोकांना विश्वास होता. बसपाला पुन्हा बहुमत मिळेल, असे ८० टक्के लोकांनी म्हटले होते. तर सत्तेसाठी काँग्रेसचा वनवास संपेल, असा विश्वास ६ टक्के लोकांचा होता. २ टक्के लोकांनी इतरांच्या बाजूने प्रतिसाद दिला. ३ टक्के लोकांनी म्हटले होते की, राज्यात कोणालाच बहुमत मिळणार नाही, म्हणजे त्रिशंकू विधानसभा होईल. २ टक्के लोकांनी सांगितले की, यूपीमध्ये कोणाचे सरकार बनणार आहे, हे माहित नाही.

    उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीलाच होणाऱ्या विधानसभा निवडणुकींबद्दल वेगवेगळे अंदाज बांधले जात आहेत. उत्तर प्रदेशमधील जनतेचा कौल यंदा कोणत्या पक्षाच्या बाजूने आहे याची देशभरामध्ये चर्चा सुरु झालीय. मात्र असं असतानाच आता एबीपी आणि सी व्होटर्सच्या सर्वेक्षणाचा एक अहवाल समोर आला असून या अहवालानुसार पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीच उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत येईल असा अंदाज व्यक्त केला जातोय.