भाजपचे मिशन 2024! राज्यासह देशभरात कमकुवत जागांवर रणनिती आखणार, हैदराबादेत 28 डिसेंबर रोजी महत्त्वाची बैठक

महाराष्ट्रातील काही कमजोर जागांचा या बेठकीत शोध घेण्यात येईल, या आधी देखील राज्यातील 24 कमकवुत जागांचा शोध घेण्यात आला आहे. तर बिहारमध्ये 21-22 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत राज्याच्या 40 लोकसभा जागांची समीक्षा होईल. इथे 40 पैकी 22 जागा सामाजिक व जातीय समीकरणाच्या हिशेबाने कमकुवत श्रेणीत ठेवल्या जात आहेत.

    नवी दिल्ली – 2024 साली देशात लोकसभा निवडणुका होणार आहेत, मात्र त्याची तयारी सत्ताधारी भाजपाने आत्तापासूनच सुरु केली आहे. त्यासाठी भाजपाने मिशन 2024 आखले आहे. या धरतीवर आगामी लोकसभा निवडणुकीची तयारी म्हणून राज्यासह देशातील 204 जागांचा शोध घेत त्या कमकुवत श्रेणीत ठेवल्या. तर महाराष्ट्रात 24 जागांचा शोध आधीच घेतलेलाही आहे. या कमजोर जागेवर भाजपा आपली ताकद वाढविण्याच्या दिशेनं रणनिती आखत आहे. या धरतीवर भाजपाची 28-29 डिसेंबरला हैदराबादेमध्ये बैठकीचे आयोजन केले आहे.

    दरम्यान, महाराष्ट्रातील काही कमजोर जागांचा या बेठकीत शोध घेण्यात येईल, या आधी देखील राज्यातील 24 कमकवुत जागांचा शोध घेण्यात आला आहे. तर बिहारमध्ये 21-22 डिसेंबरला होणाऱ्या बैठकीत राज्याच्या 40 लोकसभा जागांची समीक्षा होईल. इथे 40 पैकी 22 जागा सामाजिक व जातीय समीकरणाच्या हिशेबाने कमकुवत श्रेणीत ठेवल्या जात आहेत. याशिवाय दक्षिणेतील 84 जागा कमकुवत म्हटल्या आहेत. यासाठी भाजपाने आत्तापासूनच रणनितीचा भाग म्हणून विजयासाठी कंबर कसली आहे.

    महाराष्ट्रातील पक्ष कमकुवत जागांचे जातीय व सामाजिक समीकरण तयार करत आहे. येथील प्रभावी व्यक्तीला भाजपच्या बॅनर-पोस्टरवर पीएम मोदी व भाजप अध्यक्षांसह जागा दिली जाईल. अशा लोकांचा गट बनवून पीएमशी थेट ऑनलाइन संवाद साधला जाईल. जागांच्या 4 श्रेणी आहेत- सर्वोत्तम, चांगल्या, सुधारणायोग्य व अत्यंत खराब. डी श्रेणीची जागा म्हणजे तिथे भाजपची विजयाची शक्यता खूप कमी आहे. मात्र, या जागांवर नंबर दोनची स्थिती राहू शकते. अशा जागांचा पण बैठकीत विचार केला जाणार आहे. दरम्यान, महाराष्ट्र 24 तर, बंगाल 23, बिहार 22 आणि तामिळनाडू 36 व आंध्र 25 जागांवर बैठकीत चर्चा होणार आहे.