…तर ममता बॅनर्जी यांनी मोदींविरोधात लढावे; भाजप आमदार पॉल यांचे टीएमसी प्रमुखांना आव्हान

बंगालमधील भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी, असे पॉल यांनी म्हटले आहे.

    कोलकाता : बंगालमधील भाजप आमदार अग्निमित्रा पॉल यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. त्यांच्यात हिंमत असेल तर त्यांनी वाराणसीतून निवडणूक लढवावी, असे पॉल यांनी म्हटले आहे.

    काँग्रेसवर निशाणा साधत त्या पुढे म्हणाल्या, बंगालमध्ये काँग्रेसचे अस्तित्व राहिलेले नाही. आम्ही पाहतोय आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला कसा आहे? हे पक्ष कधीही तडजोड करू शकत नाहीत. त्यांची विचारधारा वेगळी आहे. तृणमूल काँग्रेसची विचारधारा चोरून नेपोटिझम वाढवण्याची आहे. त्यांच्यात एकच गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे चोरी. टीएमसी हिंसाचारात मारले गेलेले काँग्रेस कार्यकर्ते आघाडीसोबत मैदानात उतरल्यास जनतेला उत्तर देऊ शकतील का? हा त्यांचा दुटप्पीपणा आहे, असा आरोपही त्यांनी केला.

    काँग्रेसवर निशाणा साधत पॉल म्हणाल्या, अधीर रंजन यांनी बंगालमधील काँग्रेस कार्यालयाला कुलूप लावून त्यांनी टीएमसी कार्यालयात जाऊन बसावे. ममता बॅनजीपूर्वी भाजपने बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनाही वाराणसीतून पंतप्रधान मोदीविरोधात निवडणूक लढवण्याचे आव्हान दिले आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी नुकतेच नितीश कुमार वाराणसीत रॅली घेणार असल्याचे सांगितले होते. हिमत असेल तर त्यांनी वाराणसीतून पंतप्रधान मोदीविरोधात निवडणूक लढवली तर विरोधी पक्ष त्यांना आघाडीचा पंतप्रधान बनवतील, असा टोलाही त्यांनी हाणला होता.