‘मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित’; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान 

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमधील नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामध्ये आता राहुल गांधींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली.

बंगळुरू : देशातील राजकारणात विविध नेतेमंडळींकडून एकमेकांवर टीका केली जात आहे. त्यात भाजप नेत्यांकडून काँग्रेस आणि इतर पक्षातील नेत्यांवर टीकाटिप्पणी केली जात आहे. त्यात आता कर्नाटकचे भाजप प्रदेशाध्यक्ष नलिन कुमार कतिल (Nalin Kumar Kateel) यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ‘मुलं जन्माला घालू शकत नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले’, असं वक्तव्य कतिल यांनी केले आहे.

गेल्या काही दिवसांपासून भाजप आणि काँग्रेसमधील नेतेमंडळींकडून आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. त्यामध्ये आता राहुल गांधींवर टीका करताना भाजप नेत्याची जीभ घसरली. रामनगरा येथे भाजपच्या ‘जन संकल्प यात्रे’त नलिन कुमार कतिल बोलत होते. यावेळी त्यांनी राहुल गांधींबरोबर कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्यावरही टीकास्त्र सोडलं. त्यामध्ये ते म्हणाले, ‘राहुल गांधी आणि सिद्धरामय्या यांनी लोकांना कोरोनाची लस न घेण्याचं आवाहन केलं होतं. लस घेतल्याने मुलं होणार नाहीत. अपंगत्व येऊ शकतं, असं सांगत होते, अशी टीका नलिन कुमार कतिल यांनी केली. तसेच पुढे बोलताना कातिल म्हणाले, ‘मुलं होतं नसल्यानेच राहुल गांधी अविवाहित राहिले आहेत.’

काँग्रेसकडून समाचार

काँग्रेसचे सरचिटणीस आणि कर्नाटकचे प्रभारी रणदीप सिंह सूरजेवाला यांनी कतिल यांच्या विधानाचा समाचार घेतला. ते म्हणाले, कर्नाटक ‘भाजपच्या सर्कसमधील जोकर’ शाब्दिक जुलाबाने त्रस्त आहेत. त्यांच्याकडे कोणीही लक्ष देत नसल्याने चर्चेत राहण्यासाठी अशी विधान करतात. त्यांना गांभीर्याने घेऊ नये, असे म्हणत टोला लगावला.

…ही तर भाजपची खासियत 

अशाप्रकारे मूर्खपणा हा नेहमीच भित्रे आणि मूर्ख लोकं करत असतात. ही तर भाजपची खासियत आहे. ते विज्ञान आणि शास्त्रज्ञांचा अपमान करतील. ते वैज्ञानिकतेला विरोध करतील, असेही सुरजेवाला म्हणाले.