sadhvi pradnya thakur

भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून त्यांना आलेला फोन दुबईतून आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे(BJP MP Pragya Thakur reveals shocking information in threat case).

    भोपाळ : भाजपा खासदार प्रज्ञा ठाकूर यांना दिलेल्या धमकी प्रकरणाची चौकशी सुरू झाली असून त्यांना आलेला फोन दुबईतून आला असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे(BJP MP Pragya Thakur reveals shocking information in threat case).

    याच क्रमांकाच्या फोनवरून यापूर्वी समाजवादी पक्षाचे वरिष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांची सून अपर्णा यादव यांनाही धमकी देण्यात आली होती. धमकी देणाऱ्याने दाऊदचा भाऊ इब्राहिम कासकर असल्याचे सांगितले होते.

    ठाकूर यांना धमकी देणाऱ्याने तुमचा खून होणार आहे, व ही माहिती आगाऊ देत आहे, अशी धमकी दिली होती. अॅक्शनची रिअॅक्शन पाहा आणि नंतर बोला अशा शब्दातही त्याने ठाकूर यांना धमकावले होते. तसेच मुस्लिमांना टार्गेट करणे बंद करा, असा इशाराही दिला होता.