भाजपचे लोक महिलांचाच सातत्याने करतात अपमान; महिला आरक्षण विधेयकावरून सुप्रिया सुळेंचा संसदेत घणाघात

    Women Reservation Bill : महिला आरक्षण विधेयकावर लोकसभेत चर्चा सुरु आहे. काँग्रेस संसदीय पक्षाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज लोकसभेत या विधेयकाला पाठिंबा दिला आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भूमिका स्पष्ट केली.

    भाजपकडून महिलांचा सतत अपमान

    महिला विधेयकाला माझा पाठिंबा आहे पण मराठा आरक्षणावर सभागृहात चर्चा व्हावी, तसेच एसी, एसटी, ओबीसी महिलांना आरक्षण विधेयकात सहभागी करा, अशी मागणी सुप्रिया सुळे यांनी केली. भाजप नेत्याने मला घरी जाऊन जेवण बनवण्याचा सल्ला दिला. भाजपकडून महिलांचा सतत अपमान होत आहे, असा आरोप सुप्रिया सुळे यांनी केला.

    सुप्रिया सुळेंचा भाजपवर हल्लाबोल

    एमके कनिमोळी द्रमुकच्या वतीने बोलण्यासाठी उभ्या राहिल्या. यावेळी सत्ताधारी सदस्यांनी घोषणाबाजी केली होती. त्यानंतर राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळे यांनी विरोध केला. भाजपचे लोक महिलांचाच अपमान करतात. त्यानंतर भाजपचे लोक शांत झाले, यावरूनदेखील सुळेंनी भाजपवर हल्लाबोल केला.

    भाजप नेत्याचा सुळेंना दिला सल्ला

    राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या, निशिकांत दुबे म्हणाले की इंडीया आघाडी अशा लोकांच्या बाजूने आहे जे महिलांना खाली पळवून लावतात आणि अपमानास्पद बोलतात. मात्र, महाराष्ट्रात भाजपचे एक प्रमुख (चंद्रकांत पाटील) होते. त्यांनी मला वैयक्तिकरित्या टेलिव्हिजनवर रेकॉर्डवर सांगितले, सुप्रिया सुळे घरी जा, जेवण बनवा, दुसऱ्या देशात जा. हीच भाजपची मानसिकता आहे.