शरद पवारांच्या अनुभवाचा राष्ट्रपती पदासाठी फायदा होईल, भाजपाने पवारांना राष्ट्रपती पदासाठी उमेदवारी द्यावी – राऊत

१८ जुलै रोजी देशातील सर्वंच पदावरील राष्ट्रपती पदासाठी निवडणुका (Presidential Election) होणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी अनेक नावांची यादी समोर येत असताना, आता भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांना उमेदवारी देण्यात यावी असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी म्हटले आहे.

    अयोध्या : देशात एकामागून एक निवडणुका होतच असतात, नुकत्याच देशातील राज्यसभा निवडणुका (Rajya sabha election) पार पडल्या. यानंतर आता आगामी काळात म्हणजे २० जूनला राज्यातील विधान परिषदेच्या निवडणुका (MLC Election) होणार आहेत, तर १८ जुलै रोजी देशातील सर्वंच पदावरील राष्ट्रपती पदासाठी निवडणुका (Presidential Election) होणार आहेत. दरम्यान, राष्ट्रपती पदासाठी अनेक नावांची यादी समोर येत असताना, आता भाजपाकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar)  यांना उमेदवारी देण्यात यावी असं शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut)  यांनी म्हटले आहे.

    अयोध्या दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना राष्ट्रपती पदासाठी शरद पवारांना (Sharad Pawar)  भाजपाकडून उमेदवारी देण्यात यावी असं वक्तव्य केलं. देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते. शरद पवारांच्या एवढ्या वर्षाच्या अनुभव पाहता तसेच त्यांचे राजकीय जीवनातील अनेक टप्पे पाहता त्यांच्या अनुभवाचा फायदा राष्ट्रपती पदासाठी होईल, यासाठी भाजपाकडून शरद पवार यांना उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी राऊतांनी केली.

    दरम्यान, राष्ट्रपती म्हणून संविधानाचे रक्षण करणारा आणि एक मजबूत नेता हवा असेल तर भाजपने शरद पवार यांना उमेदवारी द्यायला हवी. देशाच्या घटनेचे रक्षण करायचे असेल, जनतेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवायचे असेल आणि देशाला राष्ट्रपती पदावरील व्यक्तीच्या अनुभवाचा फायदा व्हावा असे वाटत असेल तर सध्याच्या घडीला असा नेता म्हणून शरद पवार यांचेच नाव समोर येते. त्यामुळं पवार यांच्या नावाचा विचार करण्यास काहीच हरकत नाहीय असं संजय राऊत यांनी म्हटले.