shivrajsingh chaouvan

देशात मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यात यातील चार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत.

    नवी दिल्ली : देशात मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यात यातील चार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. तर उद्या मिझोराम राज्याचा निकाल येणार आहे. या निकालांमध्ये मध्यप्रदेशात सत्ताधारी भाजपला सत्ता राखण्यात यश आल्याचे सध्यातरी दिसत आहे. पण या निवडणुकीत विजय होईल, अशी आशा असलेल्या काँग्रेसला मात्र मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

    मध्य प्रदेशातील 230 विधानसभा जागांसाठी सकाळी 8 वाजता मतमोजणी सुरू झाली. 17 नोव्हेंबर रोजी मध्य प्रदेश विधानसभेच्या निवडणुका एकाच टप्प्यात झाल्याची माहिती आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये भाजप आघाडीवर आहे. भाजप 150 जागांच्या आघाडीवर आहे. तर काँग्रेस केवळ 67 जागांवर आघाडीवर आहे. याशिवाय इतर पक्षांचे उमेदवार दोन जागांवर आघाडीवर आहेत. या कलांवर नजर टाकली तर भाजपचे सीताशरण शर्मा, माया सिंह फग्गनसिंग कुलस्ते, विजय शाह आघाडीवर आहेत. बुधनीमधून शिवराज सिंह चौहान, छिंदवाडामधून कमलनाथ आघाडीवर आहेत.

    तसेच दमोहमधून जयंत मलय्या, खांडवा विधानसभेतून भाजपचे कांचन तन्वे, नर्मदापुरम विधानसभेतून भाजपचे विजयपाल सिंह, मुदवारामधून भाजपचे संदीप जैस्वाल, बरवारामधून भाजपचे धीरेंद्र सिंह, राघवगढमधून भाजपचे संजय पाठक विजयी झाले. यामध्ये भाजप 160 जागांवर आघाडीवर आहे तर काँग्रेसने 67 जागांची आघाडी घेतली आहे.