भाजपला मुस्लिमांची ओळख नष्ट करायची आहे; हिजाबच्या वादावरून मेहबूबा मुफ्ती भडकल्या

एएनआय न्यूज एजन्सीनुसार, मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी श्रीनगरमध्ये सांगितले की जम्मू आणि काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे, परंतु त्यांना (भाजप) त्याला सामुदायिक प्रकरण बनवायचे आहे. जम्मू-काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे. कलम ३७० रद्द केल्याने हा प्रश्न सुटला नसून तो अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. आज नाही तर उद्या केंद्र सरकारला याबाबत पाकिस्तानशी चर्चा करावी लागेल, जम्मू-काश्मीरमध्ये जितका त्रास आणि रक्त सांडले जाईल तितका भाजपला फायदा होईल हे खरे आहे. असे ही त्या म्हणाल्या.

    नवी दिल्ली : हिजाबबाबत कर्नाटकात सुरू असलेला वाद देशभर गाजला आहे. या वादावरून विरोधक सातत्याने भाजपवर हल्लाबोल करत आहेत. दरम्यान, पीडीपी प्रमुख मेहबुबा मुफ्ती यांनीही भाजपवर जोरदार निशाणा साधला आहे. मेहबूबा मुफ्ती म्हणाल्या की, मला भीती वाटते की भाजप फक्त हिजाबवर थांबणार नाही. त्यांना मुस्लिमांनाची ओळख नष्ट करायची आहे. मेहबुबा इथेच थांबल्या नाहीत. त्या म्हणाल्या की, भारतीय मुस्लिमांसाठी केवळ भारतीय असणे पुरेसे नाही, तर त्यांनी भाजपीय असणे आवश्यक आहे.

    एएनआय न्यूज एजन्सीनुसार, मेहबुबा मुफ्ती यांनी रविवारी श्रीनगरमध्ये सांगितले की जम्मू आणि काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे, परंतु त्यांना (भाजप) त्याला सामुदायिक प्रकरण बनवायचे आहे. जम्मू-काश्मीर हा राजकीय मुद्दा आहे. कलम ३७० रद्द केल्याने हा प्रश्न सुटला नसून तो अधिक गुंतागुंतीचा झाला आहे. आज नाही तर उद्या केंद्र सरकारला याबाबत पाकिस्तानशी चर्चा करावी लागेल, जम्मू-काश्मीरमध्ये जितका त्रास आणि रक्त सांडले जाईल तितका भाजपला फायदा होईल हे खरे आहे. असे ही त्या म्हणाल्या.

    दरम्यान फारुख अब्दुल्ला यांनी हिजाब वादाबद्दल सांगितले की, देश हा सर्वांसाठी समान आहे, तुम्हाला काय घालायचे आहे, काय खायचे आहे आणि कसे जगायचे आहे याचा तुम्हाला अधिकार आहे, प्रत्येकाचा स्वतःचा धर्म आहे.