
लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) 10 महिन्यांत होणार आहेत. हे लक्षात घेऊन राजकीय पक्षांच्या (Political Parties) नेत्यांनी आतापासूनच एकमेकांवर राजकीय कुरघोडी करणे सुरू केले आहे. ही निवडणूक सत्ताधारी व विरोधी आघाडी यांच्यात थेट होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : लोकसभेच्या निवडणुका (Loksabha Election) 10 महिन्यांत होणार आहेत. हे लक्षात घेऊन राजकीय पक्षांच्या (Political Parties) नेत्यांनी आतापासूनच एकमेकांवर राजकीय कुरघोडी करणे सुरू केले आहे. ही निवडणूक सत्ताधारी व विरोधी आघाडी यांच्यात थेट होण्याची शक्यता आहे. निवडणुकीच्या रिंगणात नॅशनल डेमोक्रॅटिक अलायन्स (एनडीए) आणि इंडियन नॅशनल डेव्हलपमेंटल इन्क्लुझिव्ह अलायन्स (इंडिया) या दोन आघाड्या राहणार आहे.
दोन्ही आघाड्यांतर्फे आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहे. भाजप हॅट्रिक साधून केंद्रातील सत्ता काबीज करण्याच्या प्रयत्नात आहे. तर विरोधी आघाडी मोदी सरकारला सत्तेतून बेदखल करण्याचा प्रयत्न करत आहे. या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या सर्वेक्षणात एक धक्कादायक खुलासा समोर आला आहे. सर्वेक्षणात असे सांगण्यात आले आहे की, आज जर लोकसभा निवडणूक झाली तर देशाची राजधानी दिल्लीत भाजपाला राजकीय धक्का बसू शकतो. हे सर्वेक्षण सलग तीन वेळा सार्वत्रिक निवडणुकांमध्ये आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपाला सात पैकी दोन जागा गमवाव्या लागतील. एवढेच नाही तर भाजपा समर्थकांचा आलेखही घसरण्याची शक्यता आहे.
सर्व जागा जिंकणे अवघड
सर्वेक्षणानुसार, 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला 49 टक्के मते तर आम आदमी पक्षाला 29 टक्के आणि काँग्रेसला 19 मिळवला होता. 2019 मध्ये टक्के मते मिळण्याची शक्यता आहे. पाच वर्षांपूर्वी लोकसभा निवडणुकीदरम्यान दिल्लीत कॉंग्रेस समर्थकांच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून पुढे आला होता.
सीएनएक्समध्ये ‘आप’ हा आगामी निवडणुकीत दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष असल्याचे सांगण्यात आले आहे. प्रथम क्रमांकावर भाजपाची आघाडी कायम असली तरी समर्थकांमध्ये मोठी घट झाली आहे. दिल्लीतील सात जागांपैकी भाजपाला दोन जागा गमवाव्या लागण्याची शक्यता आहे. 2014 आणि 2019 प्रमाणेच 2024 मध्ये भाजपला दिल्लीतील सातही जागा जिंकणे अवघड आहे.