पंजाब निवडणुकीत भाजपचा स्वबळाचा नारा, सर्व 117 जागा लढवण्याचा निर्णय

117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 20 जागा जिंकून आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. शिरोमणी अकाली दल (एसएडी) केवळ 15 जागा जिंकू शकला, तर भाजपला 3 जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपची अकाली दलाशी युती होती, मात्र तीन कृषी कायद्यांनंतर अकाली दलाने भाजपपासून फारकत घेतली. यावेळी भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेणार आहे.

    पंजाब : 2022 च्या पंजाब विधानसभा निवडणुकीत सर्व 117 जागा लढवण्याचा निर्णय भाजपने घेतला आहे. पंजाब भाजपच्या अध्यक्षा अश्विनी शर्मा यांनी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत ही माहिती दिली. पंजाब राज्यात 2022 च्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत. 2017 च्या विधानसभा निवडणुकीत, कॉंग्रेसने 77 जागा जिंकून राज्यात पूर्ण बहुमत मिळवले आणि 10 वर्षांनंतर SAD-BJP सरकारचा पाऊतार झाला.

    गेल्या आठवड्यात, माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी संकेत दिले होते केले की त्यांचा नवीन राजकीय पक्ष भाजपसोबत जागावाटप करेल, जर कृषी कायद्यांबाबत शेतकऱ्यांच्या हितासाठी काही तोडगा काढला जाईल.

    2017 च्या विधानसभा निवडणुकीत, काँग्रेसने 77 जागा जिंकून राज्यात पूर्ण बहुमत मिळवले होते आणि 10 वर्षांनंतर शिरोमणी अकाली दल-भाजपचं सरकार पाडलं होतं. आम आदमी पक्ष 20 जागा जिंकून दुसरा सर्वात मोठा पक्ष ठरला. तर शिरोमणी अकाली दल केवळ 15 जागा आणि भाजप 3 जागा जिंकू शकले.

    117 सदस्यीय पंजाब विधानसभेत 20 जागा जिंकून आम आदमी पक्ष दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष म्हणून उदयास आला. शिरोमणी अकाली दल (एसएडी) केवळ 15 जागा जिंकू शकला, तर भाजपला 3 जागा मिळाल्या. त्यावेळी भाजपची अकाली दलाशी युती होती, मात्र तीन कृषी कायद्यांनंतर अकाली दलाने भाजपपासून फारकत घेतली. यावेळी भाजप स्वबळावर निवडणुकीच्या रिंगणात उडी घेणार आहे.

    पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्याशी झालेल्या राजकीय वादानंतर अमरिंदर सिंग यांनी सप्टेंबरमध्ये पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला होता. पंजाबमध्ये पुढील वर्षाच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार आहेत.