की बोर्डसह ‘ही’ कंपनीकरणार ५जी फोन लॉन्च, यावर्षी होणार नवीन फोनचे लाँन्चिंग, कंपनीची ब्लॉग पोस्ट

ऑनवर्ड मोबिलिटी या ब्लॅकबेरीच्या लेटेस्ट ब्लॉग पोस्टमध्ये ब्लॅकबेरी कंपनीचा अंत झाला नसल्याची माहिती आपल्या हितचिंतकांना दिली आहे. याच्याव्यतिरिक्त कंपनीने सांगितले की, ब्लॅकबेरी फोन 5G कनेक्टिव्हिटीसह २०२२साली लॉन्च करण्यात येणार आहे. २०२१ साल हे कंपनीसाठी आव्हानात्मक होते, त्यामुळे गेल्या वर्षी नवा मोबाईल लॉन्च करता आला नसल्याची माहितीही देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली : एकेकाळी कॉर्पोरेट फोन अशी प्रसिद्धी असलेल्या ब्लॅकबेरीच्या चाहत्यांसाठी खूशखबर आहे. लवकरच 5G सपोर्टसह नवा ब्लॅकबेरी फोन लाँन्च करण्यात येणार आहे. कंपनीने अधिकृतरित्या हे प्रसिद्ध केले आहे. ब्लॅकबेरीचे 5G स्मार्टफोन २०२१ मध्ये बाजारात येणार, असे यापूर्वी सांगण्यात येत होते. मात्र ते प्रत्यक्षात शक्य झाले नाही. नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच कंपनीने ब्लॅकबेरी 10 OS किंवा त्याचे मागचे व्हर्जन असलेल्या सर्व क्लासिक स्मार्टफोनचा सपोर्ट बंद केला होता. त्यानंतर ब्लॅकबेरी कंपनी बंद होणार अशी चर्चा होती.

    कीबोर्ड नवा फोन होणार लाँन्च

    ऑनवर्ड मोबिलिटी या ब्लॅकबेरीच्या लेटेस्ट ब्लॉग पोस्टमध्ये ब्लॅकबेरी कंपनीचा अंत झाला नसल्याची माहिती आपल्या हितचिंतकांना दिली आहे. याच्याव्यतिरिक्त कंपनीने सांगितले की, ब्लॅकबेरी फोन 5G कनेक्टिव्हिटीसह २०२२साली लॉन्च करण्यात येणार आहे. २०२१ साल हे कंपनीसाठी आव्हानात्मक होते, त्यामुळे गेल्या वर्षी नवा मोबाईल लॉन्च करता आला नसल्याची माहितीही देण्यात आली आहे. नवा 5G फोन हा कीबोर्डसह लॉन्च करण्य़ात येणार आहे. फोनचे नाव आणि इतर स्पेसिफिकेशनबाबत कोणतीही माहिती अद्याप देण्यात आलेली नाही.