अभिनेता शक्ती कपूरच्या मुलाला अटक

ड्रग्ज सेवन केल्याचा संशय असलेल्या सहा लोकांचे नमुने पोलिसांनी पाठवले असून यामध्ये सिद्धांत कपूरचा नमुना पॉझिटिव्ह आला आहे. त्यांनी अमली पदार्थांचे सेवन केले आणि पार्टीला आले की हॉटेलमध्ये ते सेवन केले, हे स्पष्ट झाले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.

    बॉलीवूड अभिनेता (Bollywood Actor) शक्ती कपूर(Shakti Kapoor)चा मुलगा सिद्धांत (Siddhant kapoor) याला ड्रग्ज(Drugs)साठी घेतल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. बेंगळुरू(Bengaluru)मध्ये त्याला ताब्यात घेण्यात आले असून ड्रग्ज सेवन (Drug Use) केल्याचा आरोप असलेल्या सहा जणांमध्ये त्याचा समावेश होता.

    बॉलीवूड अभिनेता सिद्धांत कपूर याला रविवारी रात्री एका पार्टीत ड्रग्ज सेवन केल्याच्या आरोपावरून बेंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एका गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी एमजी रोडवरील एका हॉटेलवर छापा टाकला असता ड्रग्ज पार्टी (drug Party) आयोजित केल्याचे समोर आले.