हिंदु-मुस्लिम कपलमधील सेक्स संबंधांवरील पुस्तकावरून नवा वाद, अमेझॉनवर टीकेची झोड

सध्या सर्वाधिक टीकेचं लक्ष्य होतंय ते ‘इंडियन हिंदु वाईफ्स अफेअर विथ हर मुस्लिम लव्हर’ हे पुस्तक. किंडलच्या अनलिमिटेड सबस्क्रिप्शनमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलंय. निलीमा स्टीव्हन्स यांनी लिहिलेल्या या ३५ पानांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच मुस्लिम पुरूष आणि टिकली लावलेली हिंदू महिला दाखवण्यात आलीय.

देशभरात सध्या लव्ह जिहादवरून जोरदार चर्चा रंगली असताना अमेझॉन किंडलवरील एका पुस्तकामुळे नवा वाद निर्माण होताना दिसतोय. या ऍपवर उपलब्ध असणाऱ्या एका पुस्तकात धर्माच्या आधारावर अश्लिल साहित्य उपलब्ध असल्याची माहिती समोर येतीय. या ऍपवर मुस्लिम पुरूष आणि हिंदु महिला यांच्यातील संबंधांवर अनेक पुस्तकं उपलब्ध करण्यात आल्याचीही माहिती आहे.

सध्या सर्वाधिक टीकेचं लक्ष्य होतंय ते ‘इंडियन हिंदु वाईफ्स अफेअर विथ हर मुस्लिम लव्हर’ हे पुस्तक. किंडलच्या अनलिमिटेड सबस्क्रिप्शनमध्ये हे पुस्तक उपलब्ध करून देण्यात आलंय. निलीमा स्टीव्हन्स यांनी लिहिलेल्या या ३५ पानांच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावरच मुस्लिम पुरूष आणि टिकली लावलेली हिंदू महिला दाखवण्यात आलीय.

या पुस्तकात लग्न झालेली हिंदू महिला आणि तिच्या मुस्लीम मैत्रिणीचा पती यांच्यातील लैंगिक संबंधांबाबत अश्लील भाषेत वर्णन करण्यात आलंय. या पुस्तकातील हिंदू महिला शाकाहारी होती आणि नंतर ती मांसाहार करू लागली, असंही वर्णन करण्यात आलंय. याच लेखिकेची सुमारे २० पेक्षा जास्त पुस्तकं किंडलवर असून ती याच आशयाची असल्याचं सांगितलं जातंय.

सुनीत सारन नावाच्या लेखिकेचीही अनेक पुस्तकं किंडलवर उपलब्ध असून तीदेखील अशाच प्रकारे अश्लिल आणि आक्षेपार्ह वर्णन करणारी असल्याचं दिसतंय. एक दाढी असणारा पुरुष आणि दोन महिला असं मुखपृष्ठ रंगवण्यात आलंय. या दोन महिलांपैकी एकीने साडी नेसली असून दुसरी अंगावर चादर घेऊन बसल्याचं दिसतंय. हा डॉन या महिलांवर बलात्कार करतो आणि त्याचे व्हिडिओ बनवण्याची धमकी देतो, असं कथानक या लेखिकेनं रंगवलंय.