Afghanistan should not be used to spread terrorism; Modi slapped China as well as Pakistan

पंतप्रधान म्हणाले की, देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत. ५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत. १ लाख ४० हजार आयसीयू बेड्स आहेत. देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत. ४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत. राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत. चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचं काम करत आहे. लसीकरणात भारतानं मैलाचा दगड पार केलाय. पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य  असलेल्या गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे. लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार आहे. अशीही माहिती यावेळी मोदींनी दिली आहे.

  पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गाच्या मुद्द्यावरुन शनिवारी देशाला संबोधित केलं. यावेळी पंतप्रधान मोदींनी ओमायक्रॉनमुळे कोरोना योद्ध्यांना बूस्टर डोस देण्यात येणार असल्याचं सांगितलं. हे बूस्टर डोस १० जानेवारीपासून सुरू करण्याचंही जाहीर केलंय. त्याचप्रमाणे ६० वर्षांपेक्षा जास्त वयाच्या व्यक्तींना आजार आहे ते देखील १० जानेवारीपासून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार खबरदारी म्हणून बुस्टर डोस घेऊ शकणार आहेत.

  केवळ १५ मिनिटं आधी सोशल मीडियाच्या माध्यमातून अलर्ट देत पंतप्रधानांनी देशाला संबोधित केले. एकवेळ या अलर्टने सर्वांच्याच पोटात गोळा उठला होता मात्र, संबोधन सुरू झाल्यानंतर काही मिनिटांतच त्यामागचं कारण समोर आलं आणि सर्वांनीच सुटकेचा निश्वास टाकला. त्यात अर्थातच पंतप्रधान मोदी यांनी देशात लहान मुलांच्या लसीकरणाचे नवे पर्व येत्या ३ जानेवारीपासून सुरू होत असल्याचे घोषणा पंतप्रधानांनी केली.

  पंतप्रधान म्हणाले की, देशात आता १८ लाख आयसोलेशन बेड्स आहेत. ५ लाख ऑक्सिजन सपोर्टेड बेड्स आहेत. १ लाख ४० हजार आयसीयू बेड्स आहेत. देशात ३ हजारपेक्षा जास्त पीएसए ऑक्सिजन प्लांट आहेत. ४ लाख ऑक्सिजन सिलिंडर देशभरात दिले गेले आहेत. राज्यातला लागणारी बफर डोस तयार करण्यासाठी आपण सज्ज आहोत. चाचण्यांची क्षमता वाढवण्याचेही प्रयत्न सुरु आहेत. लसीकरण हे कोरोना संसर्गात महत्त्वाचं काम करत आहे. लसीकरणात भारतानं मैलाचा दगड पार केलाय. पर्यटनाच्या दृष्टीनं महत्त्वाची राज्य  असलेल्या गोवा, उत्तराखंड, हिमाचलमध्ये पहिल्या डोसचं शंभर टक्के लसीकरण पूर्ण केलं आहे. लवकरच देशात नेसल आणि डीएनए लसीनाही मान्यता मिळणार आहे. अशीही माहिती यावेळी मोदींनी दिली आहे.

  तीन मोठ्या घोषणा

  1. देशात ३ जानेवारीपासून लहान मुलांचे लसीकरण
  2. १० जानेवारीपासून हेल्थकेअर आणि फ्रंटलाइन वर्कर्सना बूस्टर डोस देण्यात येईल.
  3. १० जानेवारीपासून साठ वर्षांवरील सहव्याधीग्रस्त नागरिकांना डॉक्टरांच्या सल्ल्याने बूस्टर डोस.