वीटभट्टीच्या चिमणीचा स्फोट; मालकासह सात जणांचा मृत्यू, अनेक जण अडकले

मोतिहारी येथील अपघात रामगढवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. नागीरगीरमध्ये वीटभट्टीची चिमणी कोसळल्याने अनेक मजूर गाडले गेले. सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, १५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे.

    पटणा : बिहारच्या मोतिहारीमध्ये आग (Motihari Fire) लागल्याने वीटभट्टीच्या चिमणीचा स्फोट (Brick Kiln Blast) झाल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चिमणी मालकासह सात मजुरांचा (Workers Death) मृत्यू झाला आहे. चिमणीत अजूनही १० मजूर गाडले गेल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच, घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.

    मोतिहारी येथील अपघात रामगढवा पोलीस (Ramgadhwa Police) ठाण्याच्या हद्दीत घडला. नागीरगीरमध्ये वीटभट्टीची चिमणी कोसळल्याने अनेक मजूर गाडले गेले. सात जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तसेच, १५ जणांना जिवंत बाहेर काढण्यात आले आहे. ज्यांना जखमी अवस्थेत रक्सौल (Raxaul) येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे.

    चिमणी ऑपरेटर इर्शाद अहमद यांचाही मृत्यू झाला आहे. आतापर्यंत १० जण बेपत्ता झाले असून या माहितीवरून डीएम आणि एसपी घटनास्थळी रवाना झाले आहेत. रामगढवा, सुगौली, रक्सौल आणि पलानवासह अनेक पोलीस ठाण्याचे पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे.