
भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करायचा प्रयत्न करायचे, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणच्या प्रकरणी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना दिली.
नवी दिल्ली : भाजप खासदार बृजभूषण सिंह (Brij Bhushan Sharan Singh) जेव्हा जेव्हा संधी मिळेल तेव्हा तेव्हा महिला कुस्तीपटूंचा विनयभंग करायचा प्रयत्न करायचे, अशी धक्कादायक माहिती दिल्ली पोलिसांनी (Delhi Police) महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणच्या प्रकरणी न्यायालयामध्ये युक्तिवाद करताना दिली. यासोबतच याविषयीचे आमच्याकडे पुरेसे पुरावे असल्याचा दावादेखील पोलिसांनी केला.
अतिरिक्त मुख्य मेट्रोपॉलिटियन मॅजेस्ट्रेट हरजीत सिंग जसपाल यांनी महिला कुस्तीपटूंच्या लैंगिक छळप्रकरणी दिल्ली पोलिसांचा युक्तिवाद ऐकला. दरम्यान, लैंगिक अत्याचारप्रकरणी दिल्ली पोलिसांचा पुढचा युक्तिवाद 7 ऑक्टोबरला सुनावणीमध्ये होणार आहे. दिल्ली पोलिसांनी असेही सांगितले की, पीडित मुलीने कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.
हा प्रश्नच मुळात नाहीये. तिच्यावर अन्याय झाला हा मुद्दा महत्त्वाचा आहे. तजाकिस्तानमध्ये बृजभूषण यांनी त्या मुलीला खोलीत बोलावले. तिला जबरदस्तीने मिठी मारली. तिने विरोध केला असता आपण ही मिठी वडिलांप्रमाणे मारली असे सांगितले होते.