उत्तराखंडमधील चमोली येथे कार दरीत कोसळली; १२ प्रवाशांचा मृत्यू

उत्तराखंडमधील एसयूव्ही कार जोशीमठ येथून पल्ला जाखुला गावाकडे जात होती. यावेळी, डोंगर चढताना चालकाचे नियंत्रण सुटले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले. कार पल्ला गावाजवळील एका टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करत होती, परंतु चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली.

    डेहराडून – उत्तराखंडमधील (Uttarakhand) चमोली येथे शुक्रवारी एक एसयूव्ही कार (SUV Car) सुमारे सातशे मीटर खोल (Valley) दरीत कोसळली. या अपघातात १२ जणांचा मृत्यू झाला असून ४ जण जखमी झाले. मृतांमध्ये १० पुरूष आणि २ महिलांचा समावेश आहे. या कारमध्ये २१ जण प्रवास करीत होते, अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.

    उत्तराखंडमधील एसयूव्ही कार जोशीमठ (Joshi Math) येथून पल्ला जाखुला गावाकडे जात होती. यावेळी, डोंगर चढताना चालकाचे नियंत्रण सुटले. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस (Police) आणि अग्निशमन दलाचे (Fire Brigade) पथक घटनास्थळी पोहोचले. कार पल्ला गावाजवळील एका टेकडीवर चढण्याचा प्रयत्न करत होती, परंतु चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दरीत कोसळली. ज्या ठिकाणी हा अपघात झाला त्याठिकाणी पावसाचे पाणी जाण्यासाठी मोठी नाला बनविण्यात आला आहे. त्यामुळे रस्ता कच्चा आणि खडीमय झाला असून रस्त्यावर वाहनांना परवानगी नाही.

    एआरटीओ म्हणाले की, वाहनाची सर्व कागदपत्रे बरोबर आढळली आहेत. ज्या रस्त्यावर अपघात झाला त्या रस्त्यावर वाहनास परवानगी नाही. २०२० पासून ११ किलोमीटर लांबीच्या उरगम-पल्ला जाखोला रस्त्याचे काम सुरू आहे. अपघातापूर्वी एसयूव्ही चेकपोस्टवरून गेली होती, मात्र इथे कोणीही अडवले नाही.