manish sisodiya

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. याबाबत स्वत: मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत माहिती दिली आहे

    नवी दिल्ली : दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांच्या घरी सीबीआयने छापेमारी केली आहे. (CBI Raid On Manish Sisodiya)  याबद्दल याबाबत स्वत: मनीष सिसोदिया यांनी ट्विट करत माहिती दिली आहे. तसेच आम्ही चौकशीला पुरेपुर सहकार्या करू असंही त्यांनी म्हण्टलं आहे. दिल्ली सरकारच्या शिक्षण खात्यात घोटाळा झाल्याचा सीबीआयला संशय आहे. त्या प्रकरणी ही चौकशी केली जात असल्याची माहिती समोर आली आहे.

    सीबीआयच्या छाप्याबद्दलची माहिती स्वत: मनिष सिसोदिया यांनी ट्वीट करुन दिली आहे. “सीबीआय आली आहे. त्यांचे स्वागत आहे. आम्ही अत्यंत प्रामाणिक आहोत. लाखो मुलांचे भविष्य घडवत आहोत. आपल्या देशात चांगले काम करणार्‍यांचा अशा प्रकारे छळ होणे हे अत्यंत दुर्दैवी आहे. त्यामुळेच आपला देश अजून पहिल्या क्रमांकाचा बनलेला नाही,” असं सिसोदिया यांनी म्हटलं आहे.

    दुसऱ्या ट्वीटमध्ये सिसोदिया यांनी लिहिलं आहे की, “आम्ही सीबीआयचे स्वागत करतो. तपासात पूर्ण सहकार्य करु जेणेकरुन सत्य लवकर समोर येईल. आतापर्यंत माझ्यावर अनेक गुन्हे दाखल झाले आहेत, मात्र काहीही निष्पन्न झालेलं नाही. त्यातूनही काहीही निष्पन्न होणार नाही. देशात चांगल्या शिक्षणासाठी माझं काम थांबवता येणार नाही.”

    पुढच्या ट्वीटमध्ये मनिष सिसोदिया म्हणतात की, “दिल्लीच्या शिक्षण आणि आरोग्याच्या उत्कृष्ट कामामुळे हे लोक त्रस्त आहेत. त्यामुळेच शिक्षण, आरोग्याचे चांगले काम बंद पडाव, म्हणून दिल्लीचे आरोग्यमंत्री आणि शिक्षणमंत्र्यांना अटक करण्यात आली आहे. आमच्या दोघांवर खोटे आरोप आहेत. न्यायालयात सत्य बाहेर येईल.”