15 फेब्रुवारीपासून सुरु होणार 10वी आणि 12वी ची परिक्षा, विदयार्थांनो बघून घ्या वेळापत्रक!

1 जानेवारी 2023 पासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन आणि प्रकल्प कार्य सुरू होईल.

    केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) 2023 मध्ये होणार्‍या 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षांचे डेटशीट जारी केले आहे. या दोन्ही वर्गांच्या परीक्षा १५ फेब्रुवारीपासून सुरू होणार आहेत. इयत्ता 10वीचा शेवटचा पेपर 21 मार्चला तर 12वीचा शेवटचा पेपर 5 एप्रिलला होईल. यावेळी 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षेसाठी 34 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

    बोर्डाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, 1 जानेवारी 2023 पासून इयत्ता 10वी आणि 12वीच्या प्रात्यक्षिक परीक्षा, अंतर्गत मूल्यांकन आणि प्रकल्प कार्य सुरू करण्यात येईल. यामध्ये महत्त्वाची बाब म्हणजे विषयनिहाय वेळापत्रक संबंधित शाळांकडून जारी केले जाणार आहे. सीबीएसईने आपल्या अधिसूचनेत शाळा आणि विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.यावेळी फक्त एकच परीक्षा, आता 100 टक्के अभ्यासक्रम गेल्या वर्षी देशातील कोरोना संसर्गाची परिस्थिती पाहता दहावी आणि बारावीच्या परीक्षा दोन टर्ममध्ये घेण्यात आल्या होत्या. यादरम्यान, संसर्गामुळे एका परीक्षेत बसू न शकलेल्या विद्यार्थ्यांचे गुण दुसऱ्या परीक्षेच्या आधारे मोजण्यात आले. मात्र हे धोरण आता सीबीएसईने रद्द केले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर यावेळी बोर्डाच्या परीक्षा १०० टक्के अभ्यासक्रमासह होणार आहेत. काही दिवसांपूर्वी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेत ही माहिती दिली होती.

    शेवटच्या सत्राचा निकाल शेवटच्या सत्रात सीबीएसईच्या दहावी आणि बारावीचे निकाल जुलैमध्ये जाहीर झाले होते. इयत्ता 12वीमध्ये एकूण 92.71 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले, तर 10वीमध्ये 94.40 टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले.