भाजपाच्या विजयाचा संसदेत विजयोत्सव, भाजपाच्या खासदारांच्या संसदेत मोदी, मोदीच्या घोषणा, चार राज्यांतील विजयाबाबत जे. पी. नड्डा यांनाही दिल्या शुभेच्छा

मोदी लोकसभेत येण्यापूर्वीच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित होते. त्यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही पक्षाच्या खासदारांनी अभिनंदन केले.

    नवी दिल्ली – संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्राच्या पहिल्याच दिवशाची सुरुवात भाजपा खासदारांनी विजयोत्सवाने केली. लोकसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या. सोमवारी सकाळी ११ वाजता संसदेचे कामकाज सुरु झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे लोकसभेत आल्यानंतर, खासदारांनी मोदी-मोदीच्या घोषणा दिल्या. सुमारे तीन मिनिटे भाजपा खासदारांनी टाळ्या आणि घोषणा देत चार राज्यांतील निकालांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कौतुक केले. तसेच या आनंदात बेंचही वाजवण्यात आले.

    मोदी लोकसभेत येण्यापूर्वीच गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक कॅबिनेट मंत्री सभागृहात उपस्थित होते. त्यापूर्वी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचेही पक्षाच्या खासदारांनी अभिनंदन केले.

    पाच राज्यातील निवडणुकींचा निकाल आज जाहीर झाला. त्यामध्ये पंजाब वगळता इतर चार राज्यांध्ये भाजपचा (BJP) मोठा विजय झाला आहे. उत्तरप्रदेश, मणिपूर,उत्तराखंड या राज्यात भापाच राज्यांच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं आहे.