केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कृषी कायदे रद्द करण्याचा प्रस्ताव मंजूर, आता संसदेच्या मान्यतेची प्रतीक्षा

केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत(Cabinet Approval For Farm Laws Repeal Bill) ३ कृषी कायदे रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुपारी ३ वाजता कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या निर्णयाबाबत माहिती देतील.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi)यांनी नुकतीच कृषी कायदे रद्द(Farm Laws Repeal) करण्याची घोषणा केली होती. त्यानंतर आता हे तीन कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावाला बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. मंत्रिमंडळाच्या बैठकीत(Cabinet Approval For Farm Laws Repeal Bill) हा कायदा रद्द करण्याच्या विधेयकाला मंजुरी मिळाली आहे. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर दुपारी ३ वाजता कायदा मागे घेण्याच्या प्रस्तावाला मंजुरी देण्याच्या निर्णयाबाबत माहिती देतील.

    मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर आता हे विधेयक संसदेत मांडले जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, २९ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनात हे विधेयक मांडले जाऊ शकते. पंतप्रधान कार्यालयाच्या शिफारशीवरून कृषी मंत्रालयाने कायदा रद्द करण्यासाठी विधेयक तयार केले असल्याची माहिती मिळाली आहे.

    कायदा करण्यासाठी तसेच तो रद्द करण्यासाठीही संसदेची मान्यता आवश्यक असते. मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संसदेत मांडले जाईल. या विधेयकावर चर्चा आणि मतदान होईल. हे विधेयक मंजूर होताच तिन्ही कृषी कायदे रद्द होतील.