election commission

आयोगाच्या वतीने नागालँड, मेघालय आणि त्रिपुरातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. तिन्ही राज्यात फेब्रुवारीच्या मध्यावर निवडणुका होऊ शकतात. असं सूत्रांनी म्हटलं आहे.

    नवी दिल्ली- देशाच्या राजकीय क्षेत्रातून एक मोठी बातमी समोर येत आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाकडून (Election commission) आज देशातील काही राज्यातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होणार आहेत. बुधवारी म्हणजेच आज दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. या पत्रकार परिषदेत ; मेघालय, नागालँड व त्रिपुरा (Meghalaya, Nagaland and Tripura) या राज्यातील निवडणुकीच्या (election) तारखा आज जाहीर होणार आहेत. (Central Election Commission press conference,  Election dates for Meghalaya, Nagaland and Tripura will be announced today)

    दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, यावेळी आयोगाच्या वतीने नागालँड, मेघालय आणि त्रिपुरातील निवडणुकांच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. तिन्ही राज्यात फेब्रुवारीच्या मध्यावर निवडणुका होऊ शकतात. असं सूत्रांनी म्हटलं आहे. या तिन्ही राज्यात फेब्रुवारीच्या मध्यावर किंवा फेब्रुवारीच्या शेवटी विधानसभा निवडणुका होऊ शकतात, असं बोललं जात आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाची दुपारी 2.30 वाजता पत्रकार परिषद घेणार आहे. यात संपूर्ण निवडणूक कार्यक्रम म्हणजे आचारसंहित, मतदान आणि निकाल यांचा कार्यक्रम जाहीर होणार आहे.