
ऐन सणासुदीत डाळीचे दर हे वाढणार(Pulses Rate Will Not Rise) नाहीत. याबाबत १७ देशातील २१७ व्यापाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
देशात तेलबियांचे (India) चांगले उत्पादन असूनही भारताला परदेशातून डाळींची आयात(Pulses Import) करावी लागत आहे. त्यामुळे डाळीच्या साठ्यावर आता सरकारची(Government) करडी नजर राहणार आहे. साठवणुकीबाबत राज्य सरकारला योग्य ती माहिती वेळेत देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे आता ऐन सणासुदीत डाळीचे दर हे वाढणार(Pulses Rate Will Not Rise) नाहीत. याबाबत १७ देशातील २१७ व्यापाऱ्यांना सुचना देण्यात आल्या आहेत.
देशाच डाळीचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. मात्र व्यापाऱ्यांकडे असलेल्या डाळींच्या साठवणुकीचे नियोजन नसल्याने दर वाढतात. परिणामी सर्वसामान्य ग्राहकांना अधिकच्या दराने डाळींची खरेदी करावी लागत आहे. देशातील वार्षिक उत्पन्न पाहिले असता सन २०१९-२० मध्ये तूर दाळ ३८.९० मेट्रीक टन, उडीद दाळ २०.८० मेट्रीक टन, मसूर दाळ ११ मेट्रीक टन, मूग दाळ २५.१० मेट्रीक टन आणि चना डाळ ११८ मेट्रीक टन होती. असे असतानाच त्याच वर्षी तूर, उडीद, मसूर, मूग आणि चना डाळी इतर देशांमधून अनुक्रमे ४.५० मेट्रीक टन, ३.१२ मेट्रीक टन, ८.५४ मेट्रीक टन, ०.६९ मेट्रीक टन आणि ३.७१ मेट्रीक टन आयात कराव्या लागल्या आहेत.
डाळींच्या किमता मर्यादीत ठेवण्यासाठी सरकार संपूर्ण प्रयत्न करीत आहे. याबाबत सर्व राज्यांना पत्रे लिहून डाळींचा साठा मर्यादेचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. १७ राज्यांमध्ये २१७ व्यापाऱ्यांकडे स्टॉक मर्यादेपेक्षा जास्त डाळ आहे. आतापर्यंत व्यापाऱ्यांनी ३१ लाख मेट्रिक टन डाळींचा साठा जाहीर केला आहे. सरकारने ५०० मेट्रिक टन डाळीची साठा मर्यादा लागू केली आहे.आतापर्यंत ७.५९ मेट्रिक टन डाळी आयात करण्यात आल्या आहेत.
मोठ्या प्रमाणात डाळीचा स्टॉक तयार करण्यासाठी सरकार आयात करीत आहे. सरकारने १ लाख टन मसूर दाळ आयात करण्याचे आदेश दिले. गेल्या आर्थिक वर्षात २०२०-२१मध्ये देशात ३८.८० मेट्रीक टन, उडीद दाळ २४.५० मेट्रीक टन, मसूर १३.५० मेट्रीक टन, मूग दाळ २६.२० एमटी आणि चना दाळ ११६.२० या वर्षी देशात उत्पादित करण्यात आली. तर तूर, उडीद, मसूर, मूग आणि चना दाळ अनुक्रमे ४.४० मेट्रीक टन, ३.२१ मेट्रीक टन, ११.०१ मेट्रीक टन, ०.५२ मेट्रीक टन आणि २.९१ मेट्रीक टन या प्रमाणात आयात करावी लागली.