5g spectrum auction

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलाव (5G Spectrum Auction) आयोजित करण्याच्या दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यशस्वी बोली लावणाऱ्यांना ५ जी सेवा प्रदान करण्यासाठी नियुक्त केले जाईल.

    केंद्रीय मंत्रिमंडळाने दूरसंचार सेवांसाठी (Cabinet Nod For 5G Spectrum Auction) ५ जी स्पेक्ट्रम लिलावाला मंजुरी दिली आहे. तसेच या टेलिकॉम स्पेक्ट्रमसाठी  (Telecom Service) आगाऊ रक्कम (ॲडव्हान्स पेमेंट) भरण्याची अटही रद्द करण्यात आली आहे. केंद्र सरकारने (Central Government) माहिती दिली आहे की, लिलावात यशस्वी बोली लावणाऱ्या कंपनीला २० हफ्त्यांमध्ये रक्कम भरावी लागेल. रक्कम भरण्यासाठी तितका कालावधी दिला जाईल. जुलै महिन्याच्या शेवटी हा लिलाव होणार आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार संबंधित करार हे २० वर्षांच्या वैधतेसह एकूण ७२०९७.८५ मेगाहर्ट्झ स्पेक्ट्रमसाठी असतील.

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाने स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याच्या दूरसंचार विभागाच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. यशस्वी बोली लावणाऱ्यांना ५ जी सेवा प्रदान करण्यासाठी नियुक्त केले जाईल.

    याआधी ५ जी ध्वनिलहरींशी संबंधित आधारभूत किमतीबाबत दूरसंचार क्षेत्रातील कंपन्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली होती. त्यामुळे दूरसंचार विभागाकडून किमतीबद्दलच्या दूरसंचार उद्योगाच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी प्रक्रिया सुरू असून, त्यावर लवकरच निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही वैष्णव यांनी दिली होती.

    मार्च २०२१ मध्ये झालेल्या ध्वनिलहरी लिलावाच्या शेवटच्या फेरीत ८५५.५ मेगाहर्ट्झ ध्वनिलहरींसाठी ७७,८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त बोली आल्या होत्या. मात्र एकूण ध्वनिलहरींपैकी जवळपास ६३ टक्के ध्वनिलहरी विकल्या गेल्या नव्हत्या. यामुळेच दूरसंचार कंपन्यांनी परवडणाऱ्या किमतीसाठी आधीपासूनच मोर्चेबांधणी सुरू केली होती. एप्रिल महिन्यात भारती एअरटेलचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी (सीटीओ) रणदीप सेखों यांनी ५ जी ध्वनिलहरींच्या परवडणाऱ्या किमतीसाठी केंद्राला आवाहन केले होते.