
भारताच्या कोरोनाच्या सद्यस्थितीवर आणि चीनमध्ये (China) वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबत एका बैठकीत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर काही सूचना देण्यात आल्या.
कोरोनाच्या रुग्णांची(Corona Updates) संख्या पुन्हा वाढू लागली आहे. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच एक बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये भारताच्या कोरोनाच्या सद्यस्थितीवर आणि चीनमध्ये (China) वाढत असलेल्या कोरोना रुग्णसंख्येबाबत चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर काही सूचना देण्यात आल्या. या सूचनांची (Corona Guidelines) माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
- कोरोनाची साथ अद्याप संपलेली नाही. त्यामुळे रुग्णसंख्या कमी असली तरी कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांवर भर द्यायला हवा. गर्दीच्या ठिकाणी मुखपट्टीचा वापर करण्याबरोबरच वर्धक मात्रेसह संपूर्ण लसीकरणासाठी प्रयत्नशील राहावे.
- जास्तीत जास्त करोना रुग्णांचे नमुने जनुक्रीय क्रमनिर्धारणासाठी पाठविण्याची सूचनाही आरोग्यमंत्र्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना केली.
- चीनसह अन्य देशांतून येणाऱ्या प्रवाशांचे नमुने विमानतळावर तपासण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले.
राज्यात सक्तीबाबत आज निर्णय
केंद्राच्या सूचनेनंतर राज्य सरकारने पुन्हा कठोर उपाययोजना करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. कोरोनाच्या नव्या विषाणूचा राज्यात एकही रुग्ण नसला तरी निर्बंध लागू करायचे का, मुखपट्टीची पुन्हा सक्ती करायची की नाही, याबाबतचा निर्णय गुरुवारच्या बैठकीत घेऊ, अशी माहिती आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी दिली.