dr harshvardhan

केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी(central health minister) म्हटले आहे की, सोशल डिस्टन्सिंगचे (social distancing)पालन झाल्यास कोरोनाला रोखता येऊ शकते. मात्र अंशत: लॉकडाऊन किंवा नाइट कर्फ्यू, आठवड्याच्या शेवटी करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचा( short lockdown is not useful) फारसा फरक पडत नाही. तसेच सरकार लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यावर विचार करत असल्याचेही ते म्हणाले.

    दिल्ली. देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले आहे. नव्या रुग्णसंख्येने गेल्या वर्षीचे सर्व विक्रम मोडीत काढले आहे. महाराष्ट्रातील दैनंदिन रुग्णवाढ धडकी भरवणारी ठरत आहे. हे पाहता, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारपासून राज्यात रात्रीची संचारबंदी लागू केली आहे. मात्र नाईट कर्फ्यू तसेच आंशिक लॉकडाऊन कोरोनाला रोखण्यासाठी फारसे प्रभावी ठरणार नाही, असे केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी स्पष्ट केले आहे. यामुळे देशात पुन्हा एकदा लॉकडाऊन लागणार का ? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

    केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी म्हटले आहे की, सोशल डिस्टन्सिंगचे पालन झाल्यास कोरोनाला रोखता येऊ शकते. मात्र अंशत: लॉकडाऊन किंवा नाइट कर्फ्यू, आठवड्याच्या शेवटी करण्यात येणाऱ्या लॉकडाऊनचा फारसा फरक पडत नाही. तसेच सरकार लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यावर विचार करत असल्याचेही ते म्हणाले.

    महाराष्ट्रात शुक्रवारी दिवसभरात ३६,९०२ नवे कोरोना रुग्ण आढळले. तर एकूण १७,०१९ रुग्ण कोरोनातून बरे झाले असून त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे. शुक्रवारची आकडेवारी मिळून राज्यात आतापर्यंत २३,०००,५६ रुग्ण कोरोनातून नुक्त झाले आहेत. राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.२ टक्क्यांवर आले आहे. शुक्रवारी दिवसभरात कोरोनामुळे एकूण ११२ रुग्णांचा मृत्यू झाला. राज्यातील मृत्यूदर सध्या २.०४ टक्क्यांवर पोहोचला आहे. सध्या राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा ३६,३७,७३५ वर पोहोचला आहे. कोरोनाची वाढती रुग्णसंख्या पाहता राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रात्रीच्या जमावबंदीचे आदेश दिले. मात्र केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी नाईट कर्फ्यू आणि आंशिक लॉकडाऊनचा कोरोना रोखण्यासाठी काही उपयोग नसल्याचे म्हटले आहे.