dr bhagwat karad

बेशुद्ध पडलेल्या कॅमेरामनला केंद्रीय मंत्री भागवत कराड (Dr Bhagwat Karad Saves Cameraman's Life) यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन मदत केली आणि त्याचे प्राण वाचवले.

    केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ.भागवत कराड (Dr. Bhagwt Karad) यांच्या प्रसंगावधानामुळे एका माणसाचे प्राण वाचले आहेत. एका कार्यक्रमाच्या वेळी एक व्यक्ती बेशुद्ध पडला होता. (Viral Video) बेशुद्ध पडलेल्या कॅमेरामनला केंद्रीय मंत्री भागवत कराड (Dr Bhagwat Karad Saved Cameraman’s Life) यांनी प्रोटोकॉल बाजूला ठेऊन मदत केली आणि त्याचे प्राण वाचवले. कराड हे पेशाने शल्य-चिकित्सक आहेत. त्यामुळे त्यांनी बेशुद्ध कॅमेरामनवर लगेच उपचार सुरु केले.

    केंद्रीय मंत्री भागवत कराड दिल्लीतील ताज मानसिंग येथे मुलाखतीसाठी गेले होते. ही मुलाखत कव्हर करण्यासाठी आलेला एक कॅमेरामन बेशुद्ध पडला. त्यानंतर डॉक्टर कराड तातडीने मदतीसाठी पोहोचले. कराडांनी आधी त्याची नाडी तपासली. पल्स रेट वाढवण्यासाठी कॅमेरामनचे पंजे दाबण्यास सुरुवात केली. पुढे मग  ५-७ मिनिटांनी कॅमेरामनची तब्येत ठीक झाली.  ग्लुकोजची पातळी वाढवण्यासाठी कराडांनी त्या कॅमेरामनला मिठाईदेखील खाऊ घातली. या सगळ्या प्रकारानंतर लोक त्यांचे कौतुक करत आहेत. योगगुरू स्वामी रामदेव यांनी डॉ.कराड यांच्याबद्दल ट्विट करुन त्यांच्या कार्याचे कौतुक केले. तसेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही ट्विट करत भागवत कराड यांचा अभिमान वाटत असल्याचे लिहिले आहे.

    गेल्या वर्षीच्या नोव्हेंबर महिन्यातही कराडांनी असेच एकाचे प्राण वाचवले होते. दिल्ली ते मुंबई असा प्रवास करणाऱ्या डॉ.कराड यांनी विमानातील एका प्रवाशाला त्यांनी मदत केली होती. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचे कौतुक केले होते. भागवत कराड हे महाराष्ट्रातून राज्यसभेचे खासदार आहेत. गेल्या वर्षी म्हणजेच जुलै २०२१ मध्ये मंत्रिमंडळात त्यांचा समावेश करण्यात आला आहे.