‘भारत देश त्यांचा कायम ऋणी राहील’, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी वाहिली सीडीएस जनरल बिपीन रावत यांना श्रद्धांजली

बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari Death After Bipin Rawat Death) सोशल मीडियाच्या माध्यमातून रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    तामिळनाडूच्या कुन्नुरमध्ये आज दुपारी लष्कराचं हेलिकॉप्टर(Helicopter Crash) कोसळलं. या दुर्घटनेत एकूण १४ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेत माजी लष्करप्रमुख आणि सीडीएस बिपीन रावत (CDS Bipin Rawat Death) आणि त्यांच्या पत्नी मधुलिका यांचा मृत्यू झाला आहे. बिपीन रावत यांच्या मृत्यूनंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी (Nitin Gadkari Death After Bipin Rawat Death) सोशल मीडियाच्या माध्यमातून रावत यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

    नितीन गडकरी यांनी ट्विटमध्ये लिहिले आहे की, “मृतांच्या कटुंबियांना हे दु:ख पचवण्याची शक्ती मिळो, अशी प्रार्थना मी देवाकडे करतो. जे जखमी आहेत ते लवकर बरे व्हावेत. ओम शांती.”

     

    नितीन गडकरी यांनी म्हटले आहे की, भारत देश कायम सीडीएस जनरल बिपीन रावत यांचा ऋणी राहील. कारण त्यांनी देशसेवा करताना अत्यंत कठीण प्रसंगात चांगलं काम केलं आहे.”