घाबरु नका! भारतात कोरोना लाटेची शक्यता खूपच कमी, 98% लोकांची प्रतिकार शक्ती आहे चांगली, IIT प्रोफेसरचा दावा

जगभरातील कोरोनाची स्थिती पाहता भारतात कोरोना लाटेची शक्यता खूपच कमी, 98% लोकांनी आधीच नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित केली आहे

    सध्या चीनमध्ये (China Corona) कोरोनाने कहर केला आहे. चीनमध्ये दिवसेंदिवस कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असताना आता जगभरातील देशाच टेन्शन वाढलं आहे. या परिस्थितीत एक दिलासा देणारी बातमी समोर येत आहे. चीनमध्ये हाहाकार माजवणाऱ्या कोरोनाच्या BF.7 या नवीन प्रकारामुळे देशवासीयांनी घाबरून जाण्याची गरज नाही. कोरोनाचा हा नवा प्रकार फक्त अशा लोकांसाठी घातक आहे ज्यांची लसीमुळे प्रतिकारशक्ती विकसीत झाली आहे आणि या लसीपासून केवळ दोन टक्के लोकांची  प्रतिकारशक्ती विकसीत झाली आहे.

    याबाबतीत आयआयटी कानपूरचे प्रा. मनिंद्र अग्रवाल यांच वक्तव्य अत्यंत महत्वाच आहे. प्रो. मणिंद्र त्याच्या गणितीय मॉडेल फॉर्म्युल्याच्या मदतीने कोरोनाच्या चढ-उतारांचे मूल्यांकन करतात. त्याचे भाकीत यापुुर्वीही खरे ठरले आहेत. प्रो. अग्रवाल म्हणाले की, चीनसारखी स्थिती देशात अजिबात होणार नाही. त्यामुळे घाबरण्याची गरज नसल्याचे नाही. सामान्य जीवन जगत असल्यासारखे जगा, अफवांवर लक्ष देऊ नका असेही ते म्हणाले.

    प्रो. अग्रवाल म्हणाले की, भारतात कोरोनाला घाबरण्याचं कारण नाही, कारण भारतातील ९८ टक्क्यांहून अधिक लोकांमध्ये नैसर्गिक प्रतिकारशक्ती विकसित झाली आहे. आतापर्यंतच्या अभ्यासात समोर आलेल्या काही बाबींनुसार देशात कोविड लाट येण्याची शक्यता नाही. मात्र, लोकांनी सावध राहण्याची गरज आहे. सर्व कोविड नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.