तेलंगणात चंद्रशेखर राव यांचा BRS पिछाडीवर; काँग्रेस बहुमताच्या जवळ, जाणून घ्या सद्यस्थिती…

देशात मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यात यातील चार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. तर उद्या मिझोराम राज्याचा निकाल येणार आहे.

    नवी दिल्ली : देशात मध्यप्रदेश, छत्तीसगड, मिझोराम, राजस्थान आणि तेलंगणा या पाच राज्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. त्यात यातील चार विधानसभा निवडणुकांचे निकाल समोर येत आहेत. तर उद्या मिझोराम राज्याचा निकाल येणार आहे. या निकालांमध्ये तेलंगणात सत्ताधारी चंद्रशेखर राव यांच्या भारत राष्ट्र समितीला मोठा धक्का बसण्याची शक्यत आहे.

    तेलंगणात 119 सदस्यीय विधानसभेसाठी 30 नोव्हेंबर रोजी मतदान झाले. त्याचे निकाल आज येत आहेत. यापूर्वी, अनेक एक्झिट पोल सत्ताधारी भारत राष्ट्र समिती (BRS) वर काँग्रेसची आघाडी दर्शवत होते. त्यात आता भाजप 9, काँग्रेस 65 तर सत्ताधारी बीआरएस 40 जागांवर आघाडीवर आहे. तसेच राज्यात एमआयएमनेही 5 जागांची आघाडी घेतली आहे. सध्याच्या कलांवरून काँग्रेस सत्तेच्या जवळ असल्याचे सांगितले जात आहे.

    तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव गजवेल जागेवर आघाडी घेतली आहे. यावेळी केसीआरच्या जवळचे भाजपचे उमेदवार इयाताला राजेंद्र ८२७ मतांनी पिछाडीवर आहेत. मात्र, बीआरएसचे अनेक मंत्री पिछाडीवर आहेत. त्यात इंद्रकरण रेड्डी, कोप्पुला इसवार, वेमुला प्रशांत रेड्डी, दयाकर राव, निरंजन रेड्डी आणि इतरांचा समावेश आहे.